HDFC Bank Home Loan | HDFC बँक देणार 50 लाख रुपयांपर्यंत गृहकर्ज, एवढा असणार व्याजदर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

HDFC Bank Home Loan | आपलं स्वतःचं हक्काचं असं घर असावं. असे अनेकांचे स्वप्न असतं. आणि त्या स्वप्नांसाठी अनेकजण कष्ट करत असतात. स्वतःचं घर हे आजकाल अनेक लोकांच्या स्वप्नांच्या यादीमधील एक आहे. परंतु सध्याची महागाई पाहता एक हाती लोकांना हे घर घेता येत नाही. त्यासाठी ते वेगवेगळ्या बँकेमधून गृह कर्ज घेत असतात. अनेक बँका या त्यांच्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी किंवा त्यांना टिकवून ठेवण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवत असतात. HDFC बँक देखील .त्यांच्या ग्राहकांसाठी अनेक योजना राबवत असतात आणि त्यांच्या ग्राहकांना कमी व्याज दरात गृह कर्ज देखील उपलब्ध करून देतात.

आजकाल घरांच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. शहरातील प्रमुख शहरांमध्ये सातत्याने घराच्या किमती वाढत आहेत. त्याचप्रमाणे औद्योगीकरण, शहरीकरण, बिल्डिंग मटेरियल या सगळ्या गोष्टींची वाढ होत असल्याने घराच्या किमतीत देखील वाढ होत आहे. आता हे घर घेताना नेहमीच लोक गृहकर्ज बघत असतात तर आज आपण एचडीएफसी बँकेच्या गृह कर्जाची माहिती पाहणार आहोत.

कोणाला मिळणार गृहकर्ज ? | HDFC Bank Home Loan

एचडीएफसी बँकेकडून त्यांच्या सर्वच ग्राहकांना गृहकर्ज उपलब्ध करून दिले जाते. पगारदार लोकांना किंवा स्वतःचा बिझनेस असणाऱ्या लोकांना देखील हे कर्ज दिले जाते. बँकांकडून बँका त्यांच्या ग्राहकांना परवडणाऱ्या दरात ही कर्ज देतात. त्या लोकांचा सीबील स्कोर चांगला असतो त्यांना बँक कमी व्याजदर दरात हे कर्ज देतात. त्याचप्रमाणे जास्त आहे त्यांना कर्ज देखील जास्त उपलब्ध होते.

आपला सिबिल स्कोर हा 300 ते 900 या दरम्यान गणला जातो. ज्यांचा सिबील स्कोर 750 पेक्षा जास्त असतो त्यांना कमी व्याज दरात आणि अधिक कर्ज मिळते.

एचडीएफसी बँक किती कर्ज आकारते?

एचडीएफसी बँक हे 8.70 ते 9.38 या व्याजदरात ग्राहकांना कर्ज मंजूर करून देते. त्याचप्रमाणे स्वतःचा व्यवसाय आहे आणि पगारदार लोकांना बँकेच्या माध्यमातून 9.5 ते 9.80 या दराने गृह कर्ज दिले जाते. या बँकेकडून 50 लाख रुपयांचे कर्ज मंजूर केले जाते. आता हे जर 50 लाख रुपयांचे कर्ज घेतले तर आपल्याला किती व्याज द्यावे लागेल याची माहिती पाहूया.

50 लाखाचे कर्ज किती व्याज द्यावे लागेल

एखाद्या व्यक्तीला 30 वर्षाच्या कालावधीसाठी 50 लाख रुपयांचे कर्ज 9 टक्के व्याजदरात मिळाले तर त्या व्यक्तीला 40 हजार 231 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागतो. त्याचप्रमाणे 30 लाख रुपयांचे कर्ज 9 टक्के व्याजदराने 20 वर्षाच्या कालावधीसाठी मिळाले, तर त्याला 26992 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागतो. त्याचप्रमाणे जर 20 लाख रुपयांचे कर्ज घेतले तर 30 वर्षासाठी तर त्याला 16092 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागेल.