HDFC Bank Personal Loan | HDFC बँक ग्राहकांना देणार 12 लाखांचे पर्सनल लोन, जाणून घ्या व्याजदर आणि मासिक हप्ता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

HDFC Bank Personal Loan | प्रत्येक बँक त्यांच्या ग्राहकांसाठी नवनवीन योजना आणत असतात. जेणेकरून त्यांच्या ग्राहकांना देखील फायदा होईल आणि त्यांचे ग्राहक बँकेची टिकून राहतील. आता अशीच एक बातमी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. कारण आता एचडीएफसी बँकेमध्ये ज्यांची खाते आहेत त्या खातेधारकांसाठी खूप महत्त्वाची बातमी आहे. जर तुम्ही एचडीएफसी बँकेचे ग्राहक असाल आणि तुम्हाला पर्सनल लोन घ्यायचे असेल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी खूपच महत्त्वाची असणार आहे.

अनेकवेळा आपल्याला पैशांची चणचण भासते आणि आपण बँकेतून पर्सनल लोन घेत असतो. अनेक बँका अशा आहे जी त्यांच्या ग्राहकांना परवडणाऱ्या व्याज दरात हे पर्सनल लोन देत असतात. परंतु हे पर्सनल लोन हे इतर लोनपेक्षा महाग असते. परंतु लोकांना जेव्हा काहीच पर्याय उपलब्ध होत नाही. तेव्हा ते बँकांकडून हे पर्सनल लोन घेत असतात.

तुम्ही जर एचडीएफसी बँकेचे (HDFC Bank Personal Loan) ग्राहक असाल आणि तुम्हाला एचडीएफसी बँकेकडून 12 लाख रुपयांचे पर्सनल लोन घ्यायचे असेल, तर त्यासाठी ग्राहकांना किती व्याज भरावे लागणार आहे? त्यांना किती फायदा किंवा तोटा होणार आहे याची सविस्तर माहिती आपण पाहूया.

750 पेक्षा जास्तीत जास्त सिबिल स्कोर असलेल्यांना फायदा

कोणतेही बँकिंग व्यवहार करायचे म्हटल्यास आपला सिबिल स्कोर खूप महत्त्वाचा असतो. ज्या ग्राहकांचा सिबिल स्कोर हा 750 पेक्षा जास्त असतो. अशा ग्राहकांना 10.75 या व्याजदरात पर्सनल लोन दिले जाते. मात्र त्यांचा सीबीएस स्कोर 750 पेक्षा कमी आहे. त्यांना वैयक्तिक कर्जासाठी खूप जास्त व्याजदर लागू शकतो.

सिबिल स्कोर हा नेहमी 300 ते 90 यामध्ये गणला जातो. ज्यांचा सीबील स्कोर 750 पेक्षा जास्त असतो. अशा ग्राहकांना बँका अगदी सहजतेने आणि कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देतात.

किती व्याज द्यावे लागेल | HDFC Bank Personal Loan

एचडीएफसी बँकेच्या एखाद्या ग्राहकांनी 7.75 टक्के या व्याजदराने 12 लाख रुपये एवढे पर्सनल लोन घेतले, तर कितीचा हप्ता लागू शकतो? अशा प्रकारणामध्ये ग्राहकाला 25 हजार 940 रुपये एवढा मासिक हजार मासिक हप्ता 5 वर्षाच्या कालावधीसाठी भरावा लागतो. यामध्ये 3 लाख 56 हजार 493 रुपये एवढे तुम्हाला व्याज द्यावे लागणार आहे.