HDFC Bank च्या ग्राहकांनी अशा प्रकारे करावे UPI ट्रान्सझॅक्शन, जाणून घ्या सोपी पद्धत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील खासगी क्षेत्रातील सर्वांत मोठी बँक HDFC Bank आहे. या बँकेद्वारे ग्राहकांना अनेक सुविधा दिल्या जातात. यासोबतच आपल्या ग्राहकांना सर्वांगीण बँकिंग अनुभव देण्यासाठी मोबाईल बँकिंग सर्व्हिस देखील जाते. या HDFC मोबाईल बँकिंगद्वारे, ग्राहकांना UPI, NEFT/IMPS आणि MMID सारख्या मोडचा वापर करून एका खात्यातून दुसर्‍या खात्यात लगेचच पैसे ट्रान्सफर करता येतात. या एचडीएफसी मोबाइल बँकिंग अ‍ॅप द्वारे ग्राहकांना क्रेडिट कार्डची बिले, मोबाइल बिल आणि पाणी/वीज बिल भरण्याची देखील परवानगी मिळते.

The 20% growth principle that built HDFC Bank | Mint

एचडीएफसी मोबाइल बँकिंग सर्व्हिस हा ग्राहकांसाठी एक उत्तम पर्याय आहे. याद्वारे बँकिंगचे सर्व व्यवहार थेट मोबाइल फोनद्वारे करता येतात. आपल्याला एचडीएफसी मोबाइल बँकिंगसाठी रजिस्ट्रेशन ऑनलाइन देखील करता येईल.

HDFC Bank BHIM UPI PIN Registration - YouTube

UPI वापरण्याची प्रक्रिया जाणून घ्या

हे लक्षात घ्या कि, HDFC Bank कडून आपला UPI कसा वापरावा आणि UPI ID कसा तयार करावा हे देखील सांगितले गेले आहे.

>> सर्वांत आधी एचडीएफसी बँक मोबाइल बँकिंग अ‍ॅपच्या तळाशी असलेल्या ‘भीम यूपीआय पेमेंट’ या आयकॉनवर क्लिक करा.
>> डिव्हाइसच्या बिडिंग आणि सुरक्षिततेसाठी एक ऑटो एसएमएस तयार केला जाईल. आता हा एसएमएस पाठवावा लागेल.
>> यानंतर UPI आयडी तयार करा. आपला मोबाइल नंबर UPI आयडी सारखा 98XXXXXX21@hdfcbank असेल.
>> UPI ID शी लिंक करण्यासाठी HDFC बँक खाते क्रमांक निवडा.
>> डेबिट कार्ड डिटेल्स वापरून 4 अंकी UPI पिन तयार करा.
>> यानंतर आपले UPI रजिस्ट्रेशन पूर्ण होईल.

HDFC UPI: How to Register, Make Payments and Receive Money? - Goodreturns

HDFC Bank UPI द्वारे अशा प्रकारे करा पेमेंट

>> HDFC Bank  मोबाइल बँकिंग अ‍ॅपच्या तळाशी असलेल्या ‘भीम यूपीआय पेमेंट’ आयकॉनवर क्लिक करा.
>> यानंतर 6 अंकी अ‍ॅप पासवर्ड टाका.
>> ‘सेंड मनी’ वर क्लिक करा.
>> यानंतर ‘Pay Via’ चा पर्याय निवडा.
>> लाभार्थीचा UPI आयडी, खाते क्रमांक, IFSC.
>> मोबाईल नंबर, MMID, रक्कम आणि इतर डिटेल्स एंटर करा.
>> 4-अंकी UPI पिन एंटर करा आणि पेमेंट करा.

Fixed Deposit Interest Rate, Fixed Deposit Calculator, FD Calculator, FD Interest Rate, FD Interest Rate 2021 | Personal News – India TV

बँकेने FD वरील व्याजदरात केली वाढ

हे लक्षात घ्या कि, गेल्या महिन्यात HDFC Bank कडून दोनवेळा FD वरील व्याजदरात वाढ केली गेली आहे. बँकेने दिलेल्या माहितीनुसार, 26 ऑक्टोबर 2022 पासून हे नवीन व्याजदर लागू होणार आहेत. मात्र हे दर 2 कोटींपेक्षा कमी डिपॉझिट्ससाठी लागू असतील. HDFC बँकेने FD व्याजदरात 50 बेसिस पॉईंट्सपर्यंत वाढ केली आहे. आजच्या या दर वाढीनंतर, एचडीएफसी बँकेकडून 7 दिवसांपासून ते 10 वर्षांच्या कालावधीच्या डिपॉझिट्सवर सर्वसामान्य ग्राहकांना 3% ते 6.25% पर्यंत व्याजदर मिळेल.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.hdfcbank.com/personal/pay/money-transfer/unified-payment-interface

हे पण वाचा :
Multibagger Stock : ‘या’ केमिकल कंपनीने गुंतवणूकदारांना दिला 4000% रिटर्न !!!
Bank FD : ‘या’ बँकेच्या स्पेशल FD वर मिळेल 8.50 टक्के व्याज !!!
Train Cancelled : रेल्वेकडून आज 141 गाड्या रद्द !!! अशा प्रकारे तपासा रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट
RBL Bank ने FD वरील व्याजदरात केला बदल, नवीन व्याजदर पहा
Multibagger Stock : ऑटो क्षेत्रातील ‘या’ कंपनीने अडीच वर्षात दिला तीन पट नफा