हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । HDFC MCLR Rate Fall – खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकांपैकी एक असलेल्या HDFC बँकेने नवीन वर्षात ग्राहकांसाठी मोठी घोषणा केली आहे. बँकेने काही मुदतीच्या कर्जावरील MCLR (Marginal Cost of Funds Based Lending Rate) मध्ये 0.05 टक्क्यांची घट केली आहे. हा बदल आज 7 जानेवारी 2025 पासून लागू झाला आहे. या बदलामुळे लोकांना कर्ज घेणे स्वस्त होणार असून, व्याजदरही कमी होणार आहे. तर चला या MCLR दराबदल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
MCLR दर –
MCLR दर कमी (HDFC MCLR Rate Fall )केल्यामुळे होम लोन, कार लोन आणि पर्सनल लोनच्या EMI मध्ये घट होणार आहे. यामुळे नवीन कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना स्वस्त दरात कर्ज मिळेल, तसेच आधीच कर्ज घेतलेल्या ग्राहकांचे EMI थोडेसे कमी होतील.
MCLR दरात महत्त्वपूर्ण बदल (HDFC MCLR Rate Fall) –
HDFC बँकेने विविध कालावधीच्या कर्जांसाठी MCLR दरात काही महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. एका महिन्याचा आणि तीन महिन्यांचा MCLR दर पूर्वीप्रमाणेच 9.20% आणि 9.30% राखले गेले आहेत. मात्र, सहा महिन्यांचा MCLR 9.45% वरून 9.40% पर्यंत कमी करण्यात आला आहे, तसेच एक वर्षाचा MCLR देखील 9.45% वरून 9.40% झाला आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षासाठी MCLR दरामध्ये कोणताही बदल केलेला नाह. दुसऱ्या वर्षासाठी दर 9.45% राहिला आहे, आणि तिसऱ्या वर्षासाठी 9.50% वरून 9.45% केला आहे. या बदलामुळे HDFC बँकेच्या कर्जदारांना काही कर्जांच्या व्याज दरात कमी होण्याचा फायदा होऊ शकतो.
घर किंवा गाडी खरेदी करणाऱ्यांसाठी फायदेशीर –
MCLR दरातील बदल कर्जदारांच्या EMI (Equated Monthly Installment) वर थेट परिणाम करतो. जेव्हा MCLR दर वाढतो, तेव्हा बँकांना कर्ज देण्यासाठी जास्त खर्च होतो, ज्यामुळे होम लोन, कार लोन आणि पर्सनल लोनसारख्या कर्जांचे व्याज दर वाढतात. याउलट, MCLR दर कमी झाल्यास कर्जाचे व्याज कमी होतात आणि कर्ज घेणे स्वस्त होते. हे विशेषतः त्यावेळी महत्त्वाचे ठरते जेव्हा तुम्ही घर किंवा गाडी खरेदी करण्याचा विचार करत असाल, कारण कमी व्याज दरामुळे कर्जाचा खर्च कमी होतो. MCLR दर ठरवताना बँक रिझर्व्ह बँकेच्या रेपो दर, कर्ज घेण्यासाठीचा खर्च, ऑपरेटिंग कॉस्ट आणि जोखीम घटकांचा विचार करते, ज्याचा थेट परिणाम तुमच्या कर्जाच्या EMI वर होतो.