आरोग्यासाठी खूपच उपयुक्त आहे दही; शरीराला मिळतात ‘हे’ जबरदस्त फायदे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | माणसाच्या उत्तम आरोग्यासाठी सर्वात महत्वाचा असतो तो म्हणजे आपला आहार. आपण आपल्या रोजच्या आहारात कुठल्या गोष्टीचा समावेश करतो, कुठल्या करत नाही यावरून उत्तम आरोग्याच्या बाबतीत तुमच्या शरीराच्या असलेल्या गरजा पुर्ण होतात की नाही हे ठरत असते . आपल्या शरीराला मोठ्या प्रमाणावर प्रथिने, कार्ब, जीवनसत्वे, तसेच इतरही महत्वाची मुलद्रव्य शाररिक प्रक्रिया पुर्ण करण्यासाठी महत्वाची असतात . बर मग हे सर्व महत्वाचे घटक ज्या कोणत्या पदार्थातून आपल्याला मिळू शकतात त्यांना आपण ” पौष्टिक पदार्थ ” असे म्हणतो. तसाच एक पौष्टिक पदार्थ आपल्या प्रत्येकाच्या घरात आपली आजी किंवा आपली आई नेहमी हातोटीने बनवते ते म्हणजे “दही “. आरोग्यासाठी दही (Curd) खूपच फायदेशीर आहे. आज आपण दह्याचे अशाच काही आरोग्यदायी फायद्यांबाबत जाणून घेणार आहोत.

दुग्धजन्य पदार्थापैकी एक असलेले दही आपल्या आरोग्यासाठी सर्वोत्तम पदार्थ आहे. जो की नेहमी आपल्या आपल्या आहारात असावा. दह्यात मोठ्या प्रमाणात कार्बोहायड्रेट्स, साखर, कॅल्शियम, लोह आणि मॅग्नेशियम आढळून येतात आपल्या आहार संतुलित करण्यात मदत करतात . सोडियम व पोटॅशिअम ही महत्वाची मुलद्रव्य दही मध्ये मोठ्या प्रमाणात असतात. त्याचबरोबर दह्यात 22% पर्यंत प्रथिने असतात. जे आपल्या शरीराला मजबुती देण्यासाठी महत्वाची ठरतात. कॅल्शियम सारखे घटक आपली हाडे मजबूत करण्यासाठी मदत करतात. कार्बोहायड्रेट्स ऊर्जेचा स्रोत म्हणून काम करतात .

रोज दही खाण्याचे काय आहेत फायदे :

दही हे प्रोबायोटीक्सचा सर्वात मोठे स्रोत समजले जाते. जे की शरीरातीत उपयोगी सूक्ष्मजीवांच्या वृद्धीसाठी शरीराला मदत करतात .

दह्यामध्ये मोठ्या प्रमाणात लॅक्टोबॅसिल्लस प्रजातीचे सूक्ष्मजीव आढळून येतात. जे की मानवी पचनसंस्थाच्या मजबुतीसाठी मदत करतात .

रोज दही खाणाऱ्यांना अपचन , बद्धकोष्टता, यांसारखे पचनसंस्थेचे आजारापासून मुक्ती मिळण्यासाठी मदत होते. तसेच गॅस्ट्रोइंटेस्टाइनल सारख्या आरोग्य समस्यांचा धोका कमी करतात.

दही खाल्यामुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास देखील मदत होते. दह्यात असलेल्या प्रोबायोटीक्स घटक रोगप्रतिकार क्षमता वाढवण्यात मदत करतात .

दह्यामध्ये फॅटचे प्रमाण अधिक असते. दह्यामध्ये दुधासारखेच पोषक घटक असतात. दह्यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे दात आणि हाडेही बळकट होतात.