Health Insurance | वयाच्या 65 वर्षांनंतरही देखील खरेदी करू शकता आरोग्य विमा, आयआरडीएचा मोठा निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Health Insurance या आधी विमा खरेदी करण्यासाठी व्यक्तीची कमाल वयोमर्यादा 65 असणे खूप गरजेचे होते. परंतु आता विमानियमाने आयआरडीने विमा खरेदी करण्याची कमाल वयोमर्यादा 65 वर्षे हटवण्याचा निर्णय घेतलेला आहे. विमाधारकांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे आता कमाल वयोमर्यादा हटवण्यात आलेली आहे. तसेच असलेल्या आजारांच्या विमा संरक्षणासाठी प्रतीक्षा कालावधी देखील कमी करण्यात आलेला आहे. त्यामुळे विमाधारकांसाठी हा निर्णय अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.

आरआरडीएने केलेले बदल पुढीलप्रमाणे | Health Insurance

विमा खरेदीची कमाल वयोमर्यादा संपली

या आधी विमा कंपन्यांना 65 वर्षापर्यंतच्या व्यक्तीला नियमित आरोग्य कवचने बंधनकारक होते. परंतु आता या नियमांमध्ये बदल केला असून आरोग्य विमा खरेदी करण्याची कमाल वयाची अट नसणार आहे. कंपन्या ज्येष्ठ नागरिकांना लक्षात घेऊन विमा सादर करतील. तसेच नावीन्यपूर्ण विमा देखील आणतील.

आयआरडी या आधीपासूनच असलेल्या रोगांच्या विमा संरक्षणासाठी प्रतीक्षा कालावधी हा चार वर्षे होता. परंतु तो कालावधी आता कमी करून 3 वर्षे एवढा केलेला आहे. तसेच आता याच्या मदतीने मधुमेह, थायरॉईड हायपरटेन्शन, दमा यांसारख्या जुनाट आजारांसाठी विमा संरक्षण मिळण्यास देखील सुरुवात झालेली आहे.

अधिस्थगन कालावधी कमी केला | Health Insurance

या आधी विमा स्थगिती कालावधी हा 8 वर्षे होता. परंतु हा कालावधी आता कमी करून 5 वर्षापर्यंत केलेला आहे. त्यामुळे साठ महिन्यांच्या कव्हरेजनंतर विमा कंपनी ग्राहकांचा कोणताही दावा गैरवर्तन किंवा चुकीचे सादरीकरण या कारणास्तव नाकारू शकत नाही. त्याचप्रमाणे फसवणूक झाल्यास विमा कंपन्या कोणताही दावा ना करू शकत नाही.

विमा घेण्यापूर्वी 3 गोष्टी लक्षात ठेवा

क्लेम सेटलमेंट

विमा घेण्यापूर्वी कंपन्यांच्या क्लीन सेटलमेंटचा ट्रॅक रेकॉर्ड आणि गती तपासणी खूप गरजेचे आहे. त्याचप्रमाणे जीवनाच्या अटी आणि नियम समजून घेऊन, त्याचप्रमाणे वेगाने क्लेम सेटलमेंटसाठी डिजिटल विमा पाहणे देखील गरजेचे आहे.

प्रतिक्षा कालावधी

अनेक विमा कंपन्या अशा आहेत. ज्या एक किंवा दोन वर्षांनी आधीपासूनच अस्तित्वात असलेल्या आजारांना कवरेज करतात. परंतु काही कंपन्या फक्त तीन वर्षांनी त्यांना कव्हरेज करतात. त्यामुळे कमी कालावधी असलेल्या पॉलिसी निवडा.

या गोष्टींचा करा समावेश

विमामध्ये कुटुंबातील सदस्य, गंभीर आजार, होम केअर यांसारख्या नवीन सेवांचा समावेश करणे. देखील गरजेचे आहे ज्याचा तुम्हाला चांगला फायदा होतो.