राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागणार?, आरोग्यमंत्र्यांचं मोठं विधान; म्हणाले की…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चीनमध्ये आढळलेल्या नव्या व्हेरिएंटचे 4 रुग्ण भारतातही आढळून आले आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता भारत सरकारही अलर्ट झालं असून राज्यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रातील प्रमुख मंदिरात आजपासून मास्क सक्तीचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, कोरोनामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रात लॉकडाऊन होणार का? असा प्रश्न अनेकांना पडत आहे. यावर राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी मोठं विधान केलं आहे.

आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, सध्या देशात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे 4 रुग्ण आढळून आलेले आहेत. केंद्र सरकारकडून विशेष काळजी घेतली जात आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे फक्त 132 रुग्ण आढळून आलेले आहेत. या पार्श्वभूमीवर चीन, सिंगापूर, मलेशिया, कॅनडा, डेन्मार्क या देशातून येणाऱ्यांची थर्मल टेस्ट केली जाणार आहे. आरोग्य व्यवस्थेच्या दृष्टीने वेन्टिलेटर आणि ऑक्सिजन बेड तयार ठेवण्यात आलेले आहेत. राज्यात कोरोना आला तरी लॉकडाऊनची शक्यता नाही. सध्या तरी मास्क वापरण्याची राज्य सरकारकडून करण्यात आलेली नाही. पण नागरिकांनी काळजी घ्यावी व मास्क वापरावे.

चीनमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता केंद्राकडून राज्यातील आरोग्य विभागाला सतर्क राहण्याच्या तसेच योग्य त्या उपायोजना करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. आपल्याकडे लसीकरण मोठ्या प्रमाणात झाले आहेत. रुग्णालयीन व्यवस्था नीट ठेवावी त्याच्या सूचना दिलेल्या आहेत, पूर्ण यंत्रणा सज्ज आहे. कोरोनाबाबत नागरिकांनी घाबरून जाऊ नये,आपली काळजी घ्यावी, असे आवाहन सावंत यांनी यावेळी केले.

राज्य सरकारकडून खबरदारी….

महाराष्ट्रात कोरोनाचे फक्त 132 रुग्ण आढळून आलेले आहेत. या पार्श्वभूमीवर चीन, सिंगापूर, मलेशिया, कॅनडा, डेन्मार्क या देशातून येणाऱ्यांची थर्मल टेस्ट केली जाणार आहे. आरोग्य व्यवस्थेच्या दृष्टीने वेन्टिलेटर आणि ऑक्सिजन बेड तयार ठेवण्यात आलेले आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांना कोविड प्रशिक्षण देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शिवाय चार परदेशातून येणाऱ्या नागरिकाची थर्मल टेस्ट केली जाणार आहे. डॉ. ओक यांच्या नेतृत्वाखाली नवीन टार्स फोर्स तयार करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री सावंत यांनी दिली.

केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची आज महत्त्वाची बैठक

भारतामध्ये ओमायक्रॉनच्या BF.7 या सबव्हेरियंटचे (BF.7 Variant) चार रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे भारत सरकारकडून खबरदारी घेतली जात आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया आज राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य मंत्र्यांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. यामध्ये कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आणि नियोजन करण्यात येणार आहे.