राज्यात आणखी 15 दिवस लॉकडाऊन वाढणार असल्याचे आरोग्य मंत्र्यांचे संकेत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : देशासह राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा स्थितीत ‘ब्रेक द चेन’ या अंतर्गत राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. हे निर्बंध एक मेपर्यंत ठेवण्यात आले होते मात्र आता कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता लॉक डाऊनचा कालावधी 15 दिवस आणखी वाढवण्यात येणार असल्याचे संकेत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत.

दरम्यान आज महा विकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडली या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. याच बैठकीत करोना रुग्ण संख्या अजूनही आटोक्यात आलेली नाही त्यामुळे आणखी पंधरा दिवसांचा लॉकडाउन लागू करावा अशी मागणी मंत्र्यांनी केली होती त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्र्यांच्या निर्णयाबद्दल सहमती दर्शवली आहे. त्यामुळे राज्यात 15 मेपर्यंत लॉक डाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून या निर्णयाची घोषणा 30 एप्रिल रोजी केली जाणार आहे. अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.

राज्यात मोफत लसीकरण

राज्य सरकारकडून लसीकरणावर भर दिला जात आहे १८ वर्षांवरील सर्वांना मोफत लसीकरण करण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला आहे. 18 ते 44 वर्षे वयोगटात असलेल्या पाच कोटी 71 लाख नागरिकांचा मोफत लसीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी साधारण दहा ते बारा कोटी लसीचे डोस लागतील त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर मात्र साडे सहा हजार कोटींचा भार पडणार आहे.

 

 

 

 

Leave a Comment