Heart Attack : जगभरात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. यामध्ये सर्व वयोगटातील आणि सर्व वर्गातील लोकांचा समावेश आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांमुळे दरवर्षी 15 दशलक्षाहून अधिक लोकांचा मृत्यू होतो. यापैकी हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताने मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे.
हृदयाशी संबंधित आजार आणि हृदयविकाराचे मुख्य कारण म्हणजे अस्वास्थ्यकर जीवनशैली, शारीरिक हालचालींचा अभाव, तंबाखू आणि सिगारेटचे सेवन. जर आपण आपली जीवनशैली सुधारली तर आपण हा आजार आपल्यापासून कायमचा दूर करू शकतो, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
तंबाखूचे सेवन न करणे, मीठ कमी खाणे, फळे खाणे, नियमित व्यायाम केल्याने हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजारांचा धोका कमी होतो, असे अनेक अभ्यासातून समोर आले आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, अशा काही गोष्टी आहेत ज्यांचे सेवन न केल्यामुळे हृदयाशी संबंधित आजारांना सामोरे जावे लागते. आज आपण या गोष्टींबद्दल जाणून घेऊया सविस्तर…
या 6 गोष्टी खाल्ल्याने हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो –
एका नवीन अभ्यासात असे समोर आले आहे की, जे लोक फळे, भाज्या, नट, मासे, कडधान्ये आणि फॅटी डेअरी उत्पादने खात नाहीत त्यांना हृदयाशी संबंधित आजारांचा धोका जास्त असतो.
निरोगी आहार मिळविण्याचा दुसरा मार्ग –
हृदयाशी संबंधित आजार, हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोका कमी करण्यासाठी तुमच्या आहारात फळे, भाज्या, कडधान्ये, नट, मासे आणि फॅटी डेअरी उत्पादनांचा समावेश करणे महत्त्वाचे आहे.
जर तुम्ही संपूर्ण धान्य आणि प्रक्रिया न केलेले मांस माफक प्रमाणात खाल्ले तर तुम्हाला सकस आहार मिळू शकतो, असेही आरोग्य तज्ज्ञ सांगतात. यासोबतच हृदयाशी संबंधित आजारांचा धोकाही कमी होतो.
या पदार्थांचे करा रोज सेवन –
संशोधकांनी दिवसातून 2 ते 3 वेळा फळे आणि भाज्या, दिवसातून एकदा काजू आणि दिवसातून दोनदा दुग्धजन्य पदार्थ खाण्याचा सल्ला दिला आहे. संशोधकांनी असेही सुचवले आहे की, लोकांनी आठवड्यातून सुमारे 3 ते 4 दिवस कडधान्ये, आठवड्यातून 2 ते 3 दिवस मासे खावेत. तुम्ही आठवड्यातून एकदा तरी संपूर्ण धान्य, प्रक्रिया न केलेले लाल मांस खावे, असेही त्यांनी सुचवले.