Heart Attack And Diabetes | आजकाल मधुमेहाच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढत चाललेल्या आहेत. अगदी तरुणांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अनेक लोकांना मधुमेहाचा त्रास आहे. तुम्हाला जर मधुमेहावर नियंत्रण ठेवायचे असेल, तर तुमच्या जीवनशैलीमध्ये बदल करणे खूप गरजेचे आहे. आजकाल लोकांची जीवनशैली बदलली आहे. त्यांचे बैठे जीवन झालेले आहे. ते जास्त निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवत नाही. परंतु तुम्ही जर निसर्गासोबत थोडा वेळ घालवला, तर तुमच्या आरोग्यासाठी देखील मोठे वरदान असणार आहे. ज्या लोकांना हृदयरोग आणि मधुमेह (Heart Attack And Diabetes ) आहे. त्या लोकांनी जर निसर्गात जास्तीत जास्त वेळ घालवला, तर त्यांचा हा धोका कमी होतो. अशी माहिती एका अभ्यासातून समोर आलेली आहे. आता या अभ्यासा संबंधित महत्त्वाच्या गोष्टी आपण जाणून घेऊयात.
मधुमेहाचा धोका कमी होतो
अलीकडे जर्नल ब्रेन बिहेवियर अँड इम्युनिटीमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासात असे सांगण्यात आलेली आहे की, तुम्ही जर निसर्गात जास्तीत जास्त वेळ घालवला, तुम्हाला हृदयरोग आणि मधुमेहाचा धोका असेल, तर तो कमी होतो. याआधी अनेक अभ्यासांमध्ये शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी वातावरण चांगले असल्याचे सांगण्यात आलेले आहे.
सूजपासून आराम देते | Heart Attack And Diabetes
अलीकडील अभ्यासानुसार निसर्गात वेळ घालवल्याने जळजळ होण्याच्या तीन वेगवेगळ्या बायोमार्कर्सवर सकारात्मक परिणाम होतो. हे तीन मार्कर इंटरल्यूकिन-6 (IL-6) आहेत, जे एक सायटोकाइन आहे आणि सिस्टीमिक दाहक प्रक्रियेच्या व्यवस्थापनाशी जवळून संबंधित आहे. दुसरे सी-रिॲक्टिव्ह प्रोटीन आहे, जे उत्तेजनाच्या प्रतिसादात IL-6 आणि इतर साइटोकिन्सचे संश्लेषण करते. तिसरा फायब्रिनोजेन आहे, जो प्लाझ्मामध्ये विरघळणारे प्रथिने आहे.
या तिन्ही बायोमार्करवर निसर्गाचा प्रभाव शोधून काढण्यात आला आहे. अमेरिकेतील कॉर्नेल युनिव्हर्सिटीच्या मानसशास्त्र विभागातील प्राध्यापक आणि संशोधन पथकाचे नेतृत्व करणारे अँथनी ओंग म्हणतात की, हे संशोधन दाखवते की, निसर्गाचा आनंद घेत असताना आपण हृदय आणि मधुमेहासारख्या आजारांचा धोका कसा टाळू शकतो किंवा कमी करू शकतो .
किती लोकांचा अभ्यास झाला?
या अभ्यास गटात 1244 लोकांचा सहभाग होता. यावेळी त्यांच्या लघवी आणि रिकाम्या पोटी रक्ताचे नमुने तपासण्यात आले होते. यावेळी एंथनी ओंग यांनी असे सांगितले की, निसर्गाच्या सानिध्यात आपण किती वेळ घालवतो हे महत्त्वाचे नाही, तर त्याहून महत्त्वाचे आहे की आपण किती चांगला वेळ घालवतो. आपण निसर्गासोबत जेवढा चांगला वेळ घालवतो. तेवढा आपल्या आरोग्याला त्याचा फायदा होतो.