Heart Attack in Summer | उन्हाळ्यात घ्या आरोग्याची काळजी, अन्यथा ‘या’ कारणामुळे येऊ शकतो हृदयविकाराचा झटका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 Heart Attack in Summer | यावर्षी जास्त प्रमाणात उन्हाळा सुरू झालेला आहे. आणि या उन्हाचा आपल्या आरोग्यावर देखील विपरीत परिणाम होऊ शकतो. या ऋतूमध्ये संपूर्ण हवामान बदललेले आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे उष्माघात आणि डीहायड्रेशनचा त्रास या दिवसात जास्त प्रमाणात होतो. परंतु या अतिरिक्त उन्हामुळे तुमच्या हृदयाला हानी पोहचू शकते. वाढत्या तापमानामुळे हृदयाशी संबंधित अनेक समस्या निर्माण होतात. खास करून हृदयविकाराचा झटका ( Heart Attack in Summer) येण्याची लक्षणे असतात.

उन्हाळ्यात हृदयविकाराचा धोका का वाढतो? |  Heart Attack in Summer

डॉक्टर गुप्ता यांनी सांगितले की उष्णतेच्या लाटेमुळे हृदयविकाराचा धोका येण्याचे शक्यता वाढते. वाढत्या उष्णतेमुळे आपल्या शरीरात आपले अंतर्गत तापमान नियंत्रित करण्यासाठी प्रयत्न करत असते. यासाठी आपल्या हृदयाचे ठोके जलद होतात. त्याचप्रमाणे रक्तवाहिन्या पसरण्याने रक्तवाहिन्या यांसारख्या प्रतिक्रिया घडतात. त्यामुळे आपल्या शरीरातील ऊर्जा बाहेर पडते. आणि त्याचा परिणाम आपल्या हृदयावर होतो.

याबद्दल अधिक माहिती देताना डॉक्टर छाजर यांनी सांगितले की, ज्यांना कोणताही जुनाट आजार आहे. त्याचप्रमाणे हृदयाशी संबंधित समस्या आहे. त्या लोकांना विशेषतः जास्त तापमान झाल्याने किंवा तापमानात घट झाल्याने, देखील त्यांच्या हृदयावर परिणाम होऊ शकतो. उच्च तापमानामुळे हृदयविकाराचा झटका येणे, थकवा येणे किंवा उष्माघात यांसारख्या समस्या होऊ शकतात. यावेळी त्याचे ठोके जलद होतात. आणि त्याचा परिणाम आपल्या रक्ताभिसरण प्रणालीवर होतो. या सगळ्या कारणांमुळे हृदयविकाराचा झटका उन्हाळ्यात येण्याचे शक्यता जास्त असते.