Heart Attack Symptoms : हृदयासंबंधित समस्या दर्शवतात ‘ही’ लक्षणे; न समजल्यास येऊ शकतो हार्ट अटॅक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Heart Attack Symptoms) गेल्या काही काळात संपूर्ण जगभरात हृदय विकाराने मरणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. कोणतेही व्यसन नसलेले आणि आपल्या आरोग्याची नीट काळजी घेणाऱ्या लोकांचा देखील यात समावेश आहे. बिघडलेली जीवनशैली, चुकीच्या दैनंदिन सवयी, खाण्या- पिण्यात चुकीचे पदार्थ, दारु – तंबाखूसारख्या निकोटिनयुक्त पदार्थांचे सेवन यामुळे हार्ट अटॅकची प्रकरणे वाढल्याचे समोर आले आहे.

यांपैकी कित्येक प्रकरणांमध्ये मृत्यू टाळता येऊ शकला असता. कारण हार्ट अटॅकपूर्वी काही महत्वाची लक्षणे दिसून येतात. ज्याविषयी माहिती नसल्यामुळे बऱ्याच जणांनी जीव गमावला आहे. (Heart Attack Symptoms) आज आपण हार्ट अटॅकआधी दिसणाऱ्या काही महत्वाच्या लक्षणांविषयी जाणून घेणार आहोत. जेणेकरून येत्या काळात बरेच जीव वाचवता येईल. सतर्कतेचा प्रत्येकाला याबाबत माहिती असायला हवी. चला जाणून घेऊया.

अतिशय थकल्यासारखे वाटणे

हार्ट अटॅकचे महत्वाचे लक्षण म्हणजे अचानक येणारा थकवा. (Heart Attack Symptoms) फ्रेश असता असता अचानक येणारा थकवा हा हृदयाच्या बाबतीत समस्या असल्याचे दर्शवतो. याकडे दुर्लक्ष केल्यास हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते.

छातीऐवजी खांद्यांमध्ये वेदना जाणवणे (Heart Attack Symptoms)

जगभरात हार्ट अटॅकने मृत्यूचे प्रमाण वाढलेले आहे. हार्ट अटॅकपूर्वी दिसणारी लक्षणे न समजल्याने बऱ्याच लोकांचा मृत्यू झाला आहे. अनेकांना हार्ट अटॅकपूर्वी छातीत वेदना जाणवतात. त्यामुळे हार्ट अटॅकआधी फक्त छातीत वेदना होतात, असा अनेकांचा समज झाला आहे. तर असे नसून हार्ट अटॅकवेळी केवळ छातीतच नव्हे तर कधी कधी खांद्यामध्ये तीव्र वेदना होऊ शकतात. सोबतच थकवादेखील जाणवू शकतो.

झोपेत घाम येणे

पंखा, एसी सुरु असूनही जर झोपेत तुम्हाला घाम येत असेल तर हे हार्ट अटॅकचे लक्षण असू शकते. हृदयाशी संबंधित समस्या असल्यास झोपेत घाम येतो. अशावेळी त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. (Heart Attack Symptoms) शिवाय दम लागणे, श्वास लागणे हेदेखील हृदयविकाराचे लक्षण असू शकते.

पोटाच्या समस्या

विविध कारणांमुळे पोटाशी संबंधित समस्या जाणवतात. मात्र, वयाच्या साठीनंतर जर तुम्हाला वारंवार बद्धकोष्ठता वा अतिसार जाणवत असेल तर संपूर्ण बॉडी चेकअप करून घ्या. कारण, हे लक्षण हृदयाशी संबंधित समस्या दर्शवते. (Heart Attack Symptoms)

ॲसिडिटीचा तीव्र त्रास

एखाद्या रात्री ॲसिडिटीचा तीव्र त्रास जाणवल्यास दुर्लक्ष करू नका. हे हार्ट अटॅकचे लक्षण असू शकते. पोटात वरच्या बाजूला दुखणे, खांद्यात वेदना, पाठदुखी, जबडा वा घशात वेदना जाणवल्यास त्वरित सावध व्हा. महिलांमध्ये छातीच्या मध्यभागी वेदना जाणवण्याची समस्या होऊ शकते. (Heart Attack Symptoms) अशा ॲसिडिटीमुळे घाम येतो. ही लक्षणे हार्ट अटॅक येण्याचे संकेत ठरू शकतात.