Heart Attack येण्यापूर्वी शरीरात जाणवतात ‘ही’ लक्षणे; वेळीच व्हा सावध

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजकालच्या धावपळीच्या जगात बदललेली जीवनशैली, कामाचा ताण यांसारख्या अनेक कारणांमुळे हृदयाशी संबंधित (Heart Attack) आजारांचा धोका खूप वाढला आहे. अगदी लहान मुलांसापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत कोणालाही हार्ट अटॅक येऊ लागला आहे आणि मृत्यूचे प्रमाणही वाढत चालले आहे.

पुरेशा प्रमाणात रक्त आणि ऑक्सिजन हृदयापर्यंत पोहोचत नाही तेव्हा या आजारांना सामोरे जावे लागते. धमन्यांमध्ये कोलेस्टेरॉल जमा झाल्यामुळे हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक इत्यादी समस्यांना सामोरे जावे लागते.  हृदयाशी संबंधित कोणताही आजार असल्यास त्याची लक्षणे शरीराच्या इतर भागांवर दिसू लागतात. चला जाणून घेऊया हृदयाशी संबंधित आजारांची लक्षणे नेमकी कोणकोणती आहेत त्याबाबत….

छातीभोवती जडपणा जाणवणे –

छातीभोवती जडपणा किंवा घट्टपणा जाणवणे हे हृदयाशी संबंधित आजाराचे लक्षण असू शकते. जडपणा, घट्टपणा आणि छाती दबल्या सारखी वाटणे ही हृदयविकाराचीच लक्षणे मानली जातात. त्यामुळे अचानक कधी तुमच्या छातीत दुखू लागले किंवा जडपणा जाणवू लागला तर त्याकडे दुर्लक्ष न करता तात्काळ डॉक्टरांकडे जा.

मळमळ-

अचानक पोटात गोळा येणे किंवा मळमअशावेळी ळ होणे ही सामान्य समस्या वाटत असली तरी हे सुद्धा हृदयविकाराचेच लक्षण असू शकत. सामान्यतः महिलांमध्ये हा त्रास अधिक दिसून येतो. खूप अस्वस्थ वाटते आणि छातीत दुखण्याआधी, व्यक्तीला वारंवार उलट्या होत असल्याचे जाणवते. त्यामुळे याकडे सुद्धा दुर्लक्ष करू नका.

पायांना सूज येणे

पायांना सूज येणे आणि श्वास घेण्यास त्रास होणे ही हार्ट फेल होण्याची सामान्य लक्षणे आहेत. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करू नका.

दम लागणे –

सतत दम लागणे आणि थकवा जाणवणे याचा अर्थ तुमच्या शरीराच्या काही भागांना पुरेसा रक्तपुरवठा होत नाही. त्यामुळे जास्त हालचाल न करता सुद्धा व्यक्तीला थकवा येतो. हे सुद्धा हार्ट अटॅकचे लक्षण असू शकत.

मानेभोवती दुखणे-

हृदयविकाराचा झटका म्हणजे फक्त छातीत दुखणं नव्हे, तुमच्या मानेला किंवा जबडा दुखत असेल तर हे सुद्धा हार्ट अटॅकचे लक्षण असू शकत. त्यामुळे जर तुम्हाला कोणत्याही कारणाशिवाय जबडा किंवा मानेभोवती दुखत असेल तर याकडे सुद्धा दुर्लक्ष न करता तुम्ही ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा.