व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

भारतात वाढतेय हृदय विकाराचे प्रमाण ; WHO ची आकडेवारी पाहून व्हाल थक्क!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकालच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक जण आपल्या आयुष्यात संघर्ष करत जगत आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये स्पर्धा वाढत आहे. जगण्यासाठी माणसाच्या गरजा वाढतात आणि वाढत्या गरजा पुर्ण करताना आपले आपल्या स्वास्थ्याकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होते ते वेगळेच. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी बदलते जीवनमान , वाढणारा ताण, व्यायामाकडे जाणूनबुजून केलेले दुर्लक्ष या सर्व बाबी बघता देशात उच्च रक्तदाबाचे (High BP) रुग्ण वाढण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे .

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) जारी केलेल्या रिपोर्ट नुसार भारतात 30 ते 79 वयोगटातील 188.3 दशलक्ष रुग्ण आहेत. त्यापैकी फक्त 37 % उच्च रक्तदाबाचे रुग्णांची चाचणी झालेली असून त्यांच्यावर उपचार होणे शक्य आहे. बाकी उरलेल्या 63% उच्च रक्तदाबाचे रुग्ण उपचारापासून आणखी दूर आहेत. त्यामुळे भारतात मोठ्या प्रमाणात हृदय विकाराचे (Heart Attack) प्रमाण वाढत आहे. त्यामुळे हृदय विकाराच्या झटक्यामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण देखील वाढले आहे.भारतात होणाऱ्या मृत्युच्या 52 % मृत्यू हृदय विकारच्या झटक्यामुळे होतात असे जागतिक आरोग्य संघटनेचे मत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते भारतातील फक्त 19 % प्रौढ जनताचा रक्तदाब साधारण आहे. त्यामुळे ते निरोगी आयुष्य जगत आहेत.

उच्च -रक्तदाब म्हणजे काय?

माणसाचे शरीरात 5 लिटर रक्तसाठा असते. परंतु हे रक्त शरीरात सतत धमण्यांमधून फिरत असते . त्यातून शरीरातील प्रत्येक पेशीला ऊर्जेचा पुरवठा केला जातो. शरीरातील प्रत्येक भागात रक्त फिरते ठेवण्यासाठी त्यावर हृदयाच्या मदतीने विशिष्ट दाब दिला जातो. परंतु हा दाब 80-120 mmHg इतक्या मर्यादेतच असायला हवा . याचा वर गेल्या नंतर त्याला उच्च रक्तदाब असे म्हणतात. उच्चरक्त दाबामुळे धामण्यांवर अधिकचा दाब येऊन धामण्यांमधील रक्ताचा प्रवाह खंडित होऊ शकतो . हृदयावर अधिकचा दाब येऊन हृदय विकाराचा झटका येऊ शकतो.

उच्च-रक्तदाब का होतो?

अयोग्य आहाराच्या सेवनाने. जसे की, (तेलकट पदार्थ, खारट पदार्थ, जंकफूड-फास्टफूड, चरबीजन्य पदार्थ, तुपाचे पदार्थ, बेकरी प्रोडक्ट, बंद पाकिटातील पदार्थ, स्नॅक्स, चिप्स, लोणचे, पापड, चहा, कॉफी, मैद्याचे पदार्थ यांच्या अतिसेवनाने ) उच्च रक्तदाबाचा धोका संभावतो . तसेच आहारातील मिठाच्या अतिवापरामुळे ,लठ्ठपणामुळे,व्यायामाचा अभाव. बैठ्या आरामदायी जीवनशैलीमुळे देखील तुम्हाला उच्च रक्तदाब होऊ शकतो. तुम्हाला सिगरेट, तंबाखू, दारूचे व्यसन असेल किंवा मानसिक ताणतणाव असेल तुमची झोप अपुरी होत असेल, अपुरी विश्रांती ही कारणे रक्तदाब वाढण्यात कारणीभूत ठरतात.याशिवाय शरीरांतर्गत असलेल्या काही आजारांमध्येही रक्तदाब वाढलेला दिसतो. जसे किडनीच्या विकारांमुळे, किडनीवरील ताण वाढून रक्तदाब वाढतो.

उच्च रक्त दाबाची लक्षणे काय आहेत?

Center for disease control (CDC ) च्या मते उच्च रक्तदाबाची तशी काही खात्रीलायक लक्षणे दिसून येत नाहीत. तुमचा रक्तदाब तपासणीतूनच ही बाब उघड होऊ शकते . परंतु डॉक्टरांच्या अनुभवरून आपण संबंधित लक्षणे सांगू शकतो . जसे की,

_ डोकेदुखी, चक्कर येणे

– थकल्यासारखे वाटणे आणि सुस्ती येणे

– निद्रानाश

– हृदयाचे ठोके वाढणे

– छातीत दुखणे

– वेगवान श्वास घेणे किंवा श्वास घेण्यात त्रास होणे

– नजर धूसर होणे.

काय आहेत उपचार पद्धती?

तुम्हाला उच्च रक्तदाब आहे याचे निदान झाल्यानंतर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेऊ शकता . प्रत्येक व्यक्तिमध्ये उच्च रक्त दाबाचे कारण वेगळे असते त्यामुळे उपचारात तफावत असू शकते . तुम्हाला तुमचे डॉक्टर सांगतील तसे उपचार घेऊन व योग्य जीवन पद्धतीने जीवनमान ठरवून तुम्ही उच्च रक्तदाबा पासून मुक्ती मिळवू शकता .