Heat Stroke | उष्माघातापासून बचाव कसा करायचा? आजपासूनच ‘या’ टिप्स फॉलो करा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नुकताच उन्हाळा सुरू झालेला आहे. राज्यातील अनेक ठिकाणी उष्माघाताची समस्या निर्माण होत आहे. कारण यावर्षी उन्हाचा तडाका नेहमीपेक्षा खूप जास्त आहे. त्यामुळे अगदी लहान मुले किंवा प्रौढ सगळ्यांना या उन्हाळ्यामध्ये काळजी घेणे खूप गरजेचे आहे. जर तुम्ही उन्हामध्ये जाताना काळजी घेतली नाही, तर तुम्हाला धोका निर्माण होऊ शकतो. आजच्या या लेखांमध्ये आपण उष्माघातापासून (Heat Stroke ) बचाव करण्यासाठी नक्की काय केले पाहिजे याची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

जेवणाबाबत खबरदारी | Heat Stroke

अनेक लोक हे बाहेरील अन्न खातात. हे अन्न बनवताना कोणत्या पाण्यात बनवलेले असते. हे पाणी स्वच्छ आहे की अस्वच्छ आहे? याची आपल्याला कोणतीच कल्पना नसते. परंतु आपण हे अन्नपदार्थ खातो आणि त्यामुळे आपल्याला उलट्या होणे, थकवा येणे, जुलाब होणे यांसारख्या पोट दुखीच्या समस्या देखील निर्माण होतात. त्याचप्रमाणे अतिसाराचा धोका देखील निर्माण होतो. आधीच उन्हाळा खूप वाढलेला आहे. त्यात जर तुम्ही असे पदार्थ खाल्ले तर तुम्हाला जास्त त्रास होऊ शकतो.

उन्हात जाताना काळजी घ्या

तुम्ही जर दुपारी कामानिमित्त घराबाहेर जाणार असाल, तर त्यासाठी तुमची संपूर्ण काळजी घ्या. उन्हामुळे तुमच्या त्वचेवर लाल पुरळ येणे, किंवा जास्त घाम येणे यांसारख्या समस्या निर्माण होतात. तसेच तुम्हाला डीहायड्रेशनची समस्या निर्माण होते. त्यामुळे उष्माघात (Heat Stroke ) देखील होऊ शकतो. तुम्ही उन्हात जात असाल, तर जास्तीत जास्त पाण्याचे सेवन करा. त्याचप्रमाणे जर तुम्हाला जाताना एखादी छत्री देणे शक्य असेल, तर छत्री देखील घेऊन जा. कारण जास्त वेळ उन्हात राहिल्याने तुम्हाला उष्माघाताचा त्रास होण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे तुमचा रक्तदाब कमी होऊन तुम्हाला थकवा देखील येऊ शकतो. कधी कधी या सगळ्याचा परिणाम तुमच्या हृदयावर देखील होतो.

भरपूर पाणी प्या

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये भरपूर पाणी पिण्यासोबत नारळ पाणी किंवा रसयुक्त फळांचे सेवन करणे देखील गरजेचे आहे. नारळ पाणीमध्ये सोडियम आणि पोटॅशियम मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे तुमच्या शरीरातील पोषकतत्वे भरून निघतात. या दिवसांमध्ये तुम्ही दही, लस्सी त्याचप्रमाणे फळांचा रस या गोष्टीचे सेवन केले पाहिजे. त्यामुळे तुम्हाला डीहायड्रेशनची समस्या होणार नाही.

उष्माघात टाळण्यासाठी काय करावे

  • उष्माघात टाळण्यासाठी बाहेर जाताना छत्रीचा वापर करावा आणि भरपूर पाणी प्यावे.
  • दिवसभरात कमीत कमी दोन लिटर पाणी पिणे गरजेचे आहे.
  • त्याचप्रमाणे नारळ पाणी, लस्सी, मोसंबी, टरबूज,खरबूज यांसारख्या हंगामी पदार्थांचे सेवन देखील केले पाहिजे.
  • बाहेर जाताना उन्हापासून वाचण्यासाठी तुमच्या डोक्यात टोपी घालने किंवा गरजेचे आहे डोळ्यांचे संरक्षण देखील सनग्लासेसचा वापर करावा.
  • त्याचप्रमाणे सूर्यप्रकाशामुळे तुमच्या त्वचेला काही हानी पोहोचू नये, त्यामुळे सनस्क्रीन वापरणे देखील खूप गरजेचे आहे.
  • सूर्य बाहेर जाताना पूर्ण बाह्यांचे कपडे घाला जेणेकरून तुमच्या त्वचेचे रक्षण होईल.