गुजरातच्या केमिकल कंपनीला भीषण आग; 60 ट्रॅक्टर जळून खाक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| गुजरातच्या अरावली जिल्ह्यातील एका केमिकल कंपनीला भीषण आग लागल्याची दुर्घटना घडली आहे. या आगीमध्ये केमिकलने भरलेले तब्बल 60 ट्रॅक्टर जळून खाक झाले आहेत. सध्या ही आग आटोक्यात आणण्याचे काम अग्निशामक दलाच्या जवानांकडून सुरू आहे. यासाठी अग्निशामक दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अद्यापही आग कशी लागली हे समोर आलेले नाही. मात्र या आगीत कोणतीही जीवित हानी झालेली नाही.

समोर आलेल्या माहितीनुसार, बुधवारी पहाटेच्या वेळी केमिकल कंपनीतील आतील भागात आग लागल्याचे दिसून आले. ज्यामुळे कर्मचाऱ्यांचा गोंधळ उडाला. यानंतर ताबडतोब ही आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. तसेच, यानंतर अग्निशामक दलाच्या आणखीन दहा गाड्या आग विझवण्यासाठी बोलावून घेण्यात आल्या. या सर्व घटनेत ही आग कशी लागली हे समोर आलेले नाही. मात्र या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सध्या या सर्व घटनेचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.