कराडला विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यांसह पावसाची हजेरी; वीज पुरवठा खंडित

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट ओढावलं असून आज दि.15 पासून ते 19 मार्चपर्यंत राज्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये अतिवृष्टी होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला होता. या दरम्यान आज सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास कराड शहरासह तालुक्यातील विविध भागात विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. यावेळी शहरातील वीज पुरवठाही खंडीत झाला.

कराडमध्ये दिवसभर तापमान चांगलेच वाढले होते. दिवसभर उकाडा जाणवत होता. सायंकाळी मात्र वातावरणात बदल झाला अचानक ढग दाटून आले आणि वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडासह पाऊस पडला. यावेळी नागरिकांची चागलीच तारांबळ उडून गेली.

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार धुळे, नंदुरबार, कोल्हापूर, सातारा, सोलापूर आणि नांदेड जिल्ह्याच्या काही भागांमध्ये पुढच्या तीन-चार तासांमध्ये वीजांच्या गडगडाटासह पाऊस पडेल असे सांगितले आहे. तसेच 30-40 किमी प्रती तासाच्या वेगाने वारे वाहतील, अशी शक्यताही हवामान खात्याने व्यक्त केली आहे.