उत्तर भारतात पावसाचे थैमान!! पाणीच पाणी चोहीकडे… गाड्या गेल्या वाहून, पूलही कोसळला (Video)

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताच्या उत्तर आणि पश्चिम भागात पावसाने अक्षरशः थैमान घातलं आहे. धुवाधार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी साचलं असून वाहतूक ठप्प झाली आहे. लोकांचे जीवनमान विस्कळीत झालं आहे. देशाची राजधानी दिल्लीत अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाली होती. तर फ्लॅटचे छत कोसळून एका ५८ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे . दिल्लीत तब्बल ४१ वर्षांनी रेकॉर्डब्रेक पाऊस पडला आहे. भारतीय हवामान खात्याने दिल्ली, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान, पंजाब आणि जम्मू-काश्मीरमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.

हरियाणा आणि पंजाबच्या अनेक भागातही धुवाधार पावसाने हजेरी लावली आहे. जम्मू-काश्मीरमध्येही गेल्या २४ तासात तुफान पाऊस झाला आहे. जम्मू-काश्मीरमधील पूंछमध्ये पोशाना नदी ओलांडताना लष्कराचे दोन जवान बुडाले. त्याच वेळी हिमाचलमध्ये 5, जम्मूमध्ये 2 आणि यूपीमध्ये 4 लोकांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे.

पावसाची संततधार आणि भूस्खलनामुळे अमरनाथ यात्रा सलग दुसऱ्या दिवशी स्थगित करण्यात आली. पावसाचा कहर इतक्या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे कि, हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यात बियास नदीच्या प्रवाहामुळे औट-बंजारला जोडणारा पूल वाहून गेला आहे. अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्यामुळे रस्ते बंद झाले आहेत. हवामान खात्याने हिमाचल प्रदेशातील सात जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे.