यंदाच्या दिवाळीत पावसाची हजेरी! महाराष्ट्रासह देशातील ‘या’ भागात कोसळणार धारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यात दिवाळीचा सण आला की हळूहळू थंडी पडायला सुरुवात होते. परंतु सध्या वातावरणात अनेक बदल जाणवू लागल्यामुळे यंदा दिवाळीच्या मुहूर्तावर पावसाचे आगमन होणार आहे. नुकताच हवामान खात्याने राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे पुढील 24 तासात राज्यासह देशांत मुसळधार पाऊस कोसळणार आहे. सध्या वेस्टर्न डिस्टर्बन्स मुळे महाराष्ट्राबरोबर संपूर्ण देशात अवकाळी पावसाच्या सरी बरसत आहेत. हे बदल अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने दिसून येत असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.

या भागात होणार बर्फवृष्टी 

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पुढील 24 तासात गोवा कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळू शकतो. सध्याच्या स्थिती पाहता, महाराष्ट्रतील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, लातूर अशा अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. तसेच पश्चिम भागात देखील हलक्या सरींचा पाऊस बरसला आहे. मुख्य म्हणजे, महाराष्ट्रामध्ये पाऊस तर हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्ये बर्फवृष्टी पडण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी पावसाच्या हलक्या सरींबरोबर घालवावी लागणार आहे.

दरम्यान, उद्या म्हणजेच दहा नोव्हेंबर रोजी पंजाब हरियाणा उत्तर पश्चिम आणि राजस्थानमधील काही भागांत पावसाच्या हलक्या सरी बसू शकतात. तसेच दिल्लीत देखील पाऊस पडू शकतो. इतकेच नव्हे तर, पुढील 3 दिवस गोवा आणि दक्षिण महाराष्ट्राच्या काही भागात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. हा पाऊस मुसळधार नसला तरी हलक्या सरी बसू शकतात.