व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

सातारा जिल्ह्यात दुष्काळी पट्ट्यात पावसाची जोरदार हजेरी

सातारा | गेल्या दोन दिवसापासून पावसाने जिल्ह्यातील अनेक भागात हजेरी लावण्यास सुरूवात केली आहे. कोरेगाव, फलटण व माण- खटाव या दुष्काळी पट्ट्यातील तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यासोबत कराड, पाटण भागातही काही काळ पावसाने हजेरी लावली. तर आदर्की परिसरात ढगफुटी सदृश्य पावसाने विजेच्या गडगटासह पाणी पाणी केले.

सातारा जिल्ह्यात कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह सातारा, वाई, जावली, महाबळेश्वर, कराड व पाटण तालुक्यात गेल्या महिन्यात चांगलीच हजेरी लावली होती. त्यामुळे जिल्ह्यातील धरणे जवळपास सर्वच भरली, पावसाचे प्रमाण वाढल्याने अनेकदा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले होते. या पावसामुळे शेतकरी सुखावला होता. पिण्याच्या पाण्याची व शेतीच्या पाण्याची चिंता मिटली आहे.

आता काल पासून दुष्काळी पट्ट्यात पावसाने कहर केला आहे. अनेक ठिकाणी ढग सदृश्य असा पाऊस पडत आहे. काल कोरेगाव व फलटण तालुक्यातील आदर्की परिसरात जोरदार हजेरी लावली. तर पाटण तालुक्यातील ढेबेवाडी येथेही पावसाने कहर केला. आजही पावसाने दुपारनंतर जोरदार हजेरी लावली आहे. परंतु या पावसामुळे शेतकऱ्यांचे व व्यापाऱ्यांचे नुकसान होवू लागले आहे.