हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा आरक्षणासाठी (Maratha Aarakshan) मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांची पदयात्रा मुंबईच्या दिशेने निघाली आहे. जरांगे यांच्यासोबत लाखो मराठा बांधव पदयात्रेत सामील झाले आहेत रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी संपूर्ण रस्त्यावर बघायला आपल्याला मिळत आहे. उद्या 25 जानेवारी रोजी ही पदयात्रा नवी मुंबईत दाखल होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर 25 जानेवारी रात्री 12 ते 26 जानेवारीला रात्री 11 वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या जड-अवजड वाहनांना शहरात प्रवेशबंदी (Heavy Vehicles Banned In Navi Mumbai) करण्यात आली आहे. नवी मुंबई वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त तिरुपती काकडे यांनी याबाबत अधिसूचना जारी केली आहे. मात्र ही अधिसूचना अत्यावश्यक सेवेसाठी मात्र लागू नसेल.
मनोज जरांगेंच्या मराठा आरक्षण यात्रेचा आजचा पाचवा दिवस आहे. आज त्यांचा लोणावळ्यात मुक्काम असणार आहे. उद्या म्हणजेच गुरुवारी 25 जानेवारीला जरांगे पाटलांचा मोर्चा नवी मुंबईत दाखल होणार आहे. त्याठिकाणी त्यांच्या मुक्काम सुद्धा होणार आहे. यावेळी नवी मुंबईतली मैदानं, सामाजिक सभागृहं, शाळा, एपीएमसी मार्केट या ठिकाणी मराठा आंदोलकांच्या निवासाची, जेवणाची आणि त्यांच्या वाहनांच्या पार्किंगची सोय करण्यात आली आहे. लाखोंच्या संख्येने मराठा बांधव मुंबईत येणार असलयाने वाहतूक व्यवस्थेवर भार पडणार आहे तसेच पोलीस प्रशासनाला सुद्धा तारेवरची कसरत करायला लागणार आहे.
दरम्यान, कोणत्या परिस्थिती आरक्षण घेणारच असा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. आरक्षणाची लढाई सध्या अंतिम टप्प्यात आली आहे त्यामुळे कोणीही कितीही आडवा आला तरी मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळणारच असं त्यांनी म्हंटल आहे. प्रत्येकवेळी सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली आहे. आता पहिल्यांदाच मराठा समाजात एकजूट झाली आहे तरीही यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न सुरु आहे मात्र मी कधीही मराठा समाजाशी गद्दारी करणार नाही असं मनोज जरांगे पाटील यांनी ठणकावून सांगितलं आहे.