हिना गावित नेमक्या कशामुळे हरल्या; महत्वाची कारणे पहाच

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जिंकून यायचं पण दणक्यात… आणि सगळ्यांचे अंदाज चुकवत…महाराष्ट्राच्या आजच्या महा रिजल्ट मध्ये कधी नव्हे ती चर्चा झाली नंदुरबारच्या जागेची…सलग तिसऱ्यांदा भाजपच्या हिना गावित (Heena Gavit) खासदार होणारच याचा मतदानापासून ते एक्झिट पोल पर्यंत गवगवा झाला… पण मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हा 440 चा करंट लागावा तसा गोवाल पाडवी यांनी मतांचा सुळका मारत मोठं लीड घेतलं… महाराष्ट्रात सर्वात फास्ट लाखांचं लीड घेऊन खासदार बनण्याचा बहुमानही त्यांना मिळाला…भाजपच्या 15 वर्षांच्या प्रस्थापित राजकारणाला अखेर पाडवी यांनी नख लावत उत्तर महाराष्ट्रात भाजपला मोठा दणका दिलाय.. भाजपचा हा गावित फॅक्टर खानदेशात कसा गंडलाय? गोवाल पाडवी यांनी एकदम झटक्यात मतांचा सुळका कसा घेतला? त्याचीच ही इन साईड स्टोरी…

स्टॅंडिंग खासदार हिना गावित यांचं राजकारण संपण्यामागचं पाहिलं कारण ठरलं मतदारसंघात असलेली नाराजी

खर तर 2014 आणि 2019 मध्ये खासदार होऊनही हिना गावित यांच्याकडून नंदुरबारचा हवा तसा विकास न झाल्याने मतदारसंघात हिना गावित यांच्याविषयी आधीपासूनच नाराजी होती. नंदुरबारचा इतिहास बघितला तर 2014 ला पहिल्यांदा भाजपनं इथून खातं उघडलं. केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असल्याने मतदार संघातील जनतेला मोठ्या विकासाची अपेक्षा होती, मात्र अपेक्षाभंग झाल्याचे मत जनमानसात होते. त्याचा फटका हिना गावित यांना बसला. याउलट गोवाल पाडवी यांच्यासारख्या राजकारणातील नव्या पिढीच्या चेहऱ्याकडून मतदारांच्या अपेक्षा वाढल्या….

Heena Gavit यांचा नंदुरबारमध्ये Gowaal Padavi यांनी धुव्वा केलाय | Nandurbar Lok Sabha Result

भाजपचा गावित फॅक्टर खानदेशात गंडण्यामागचं दुसरं कारण म्हणजे शिंदे गटाच्या आमदारांची नाराजी

महायुतीत ट्रिपल इंजिन सरकारच्या नावाखाली एका छताखाली येत आपण किती गुण्या गोविंदाने राहतोय. असं दाखवत असले तरी नंदुरबारमध्ये युतीत गटातटाचं राजकारण बघायला मिळालं. शिंदे गटाला पाठिंबा दिलेल्या अपक्ष आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी यंदा उघडपणे काँग्रेसच्या गोवाल पाडवी यांचा प्रचार केल्याने हिना गावित मायनस मध्ये गेल्या. चंद्रकांत रघुवंशी यांच्या या भूमिकेमुळे साक्री विधानसभा मतदारसंघात गोवाल पाडवी याना लीड मिळताना दिसलं. महायुतीतील गटातटाच्या या राजकारणामुळे हिना गावित यांच्याबद्दल मतदारसंघात चुकीचे नरेटिव्ह पसरलं. तर दुसरीकडे महाविकास आघाडीने मात्र एकदिलाने गोवाल पाडवी यांचा प्रचार केला.

भाजपचा गावित फॅक्टर खान्देशात गंडण्याचं तिसरं कारण म्हणजे गोवाल पाडवी यांची स्वच्छ प्रतिमा

गोवाल पाडवी (Goval Padvi) हे राजकारणात तसे नवखे असून प्रथमच लोकसभेच्या रिंगणात उभे होते. के सी पाडवी यांचा मुलगा एवढीच त्यांची आत्तापर्यंत ओळख होती . बाकी राजकारणाची पाटी कोरी आहे. पण याचा त्यांना फायदाच झाला असं म्हणता येईल. कारण एकीकडे गावित कुटुंबीय हे भ्रष्टाचारात बरबटलेले आहे. अशी चर्चा जनसामान्यात असताना गोवाळ पाडवी हे नवखे असल्याचे त्यांच्यावर भ्रष्ट्राचाराचा कोणताही आरोप नाही. त्यामुळे स्वच्छ प्रतिमेचे गोवल पाडवी हे हिना गावीत त्यांचा पराभव करू शकतात असं सुरुवातीपासूनच बोललं जात होत. अखेर गोवाल पाडवी यांनी ऐतिहासिक विजय मिळवत नंदुरबारमध्ये काँग्रेसचा झेंडा फडकवला आहे. तुम्हाला काय वाटत? हिना गावित यांचा पराभव नेमका कसा झाला? तुमचं मत आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा