केदारनाथ मध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; 6 जणांचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तराखंड येथील केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. खराब हवामान आणि धुक्यामुळे हे हेलिकॉप्टर कोसळल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या अपघातानंतर SDRF आणि NDRF टीम बचावकार्यात गुंतली आहे.

केदारनाथमध्ये भगवान शंकराचे दर्शन करून भाविक परतत असताना हा अपघात झाला. जोरात स्फोट झाल्याने हेलिकॉप्टरला आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. रुद्रप्रयागपासून दोन किमी अंतरावर हेलिकॉप्टर कोसळले. अपघाताच्या ठिकाणी दाट धुके असून हलकासा बर्फवृष्टीही होत आहे.

यापूर्वी, 2019 मध्येही केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळले होते. प्रवाशांना केदारनाथहून फाटा येथे घेऊन जात असताना हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने पायलटला इमर्जन्सी लँडिंग करावे लागले आणि यादरम्यान हेलिकॉप्टरचा अपघात झाला होता.