Helicopter Joyrides : पर्यटकांसाटी हेलिकॉप्टर जॉयराइडची सुविधा; महाराष्ट्रातील या जिल्ह्यात होणार सुरु

Helicopter Joyrides
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Helicopter Joyrides । नाशिकसह महाराष्टरातील पर्यटकांसाठी आनंदाची बातमी आहे. गंगापूर धरणाच्या बॅकवॉटरवर बोट क्लबजवळ असलेल्या ग्रेप पार्क रिसॉर्टमध्ये १५ ते ३० मिनिटांच्या स्लॉटसाठी हेलिकॉप्टर जॉयराइड सुरू करण्याचा निर्णय महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (MTDC) घेतला आहे. नाशिक जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि पर्यटन स्थळांची सुलभता वाढविण्यासाठी पर्यटन विकास महामंडळाने हे पाऊल उचलले आहे. यापूर्वी हि सुविधा राजस्थान सारख्या देशातील इतर राज्यात सुरु होती. आता महाराष्ट्रातील पर्यटकांनाही हेलिकॉप्टर जॉयराइडचा आनंद घेता येणार आहे.

बोट क्लब आणि ग्रेप पार्क रिसॉर्ट व्यतिरिक्त, गंगापूर धरणाजवळ दोन प्रमुख वाईनरी आहेत ज्या पर्यटन आकर्षण म्हणून देखील काम करतात. मुंबई, पुणे, गुजरात आणि देशाच्या इतर भागांमधून याठिकाणी दररोज हजारो पर्यटक येतात. नाशिक शहराव्यतिरिक्त, माळशेज घाट एमटीडीसी रिसॉर्ट, कार्ला, लोणार, गणपतीपुळे आणि भीमाशंकर येथे हेलिकॉप्टर जॉयराइड सेवा सुरू केली जाणार आहे.

3 महिन्यात सुरु होणार सेवा – Helicopter Joyrides

याबाबत एमटीडीसी अधिकाऱ्यांनी म्हंटल की, नाशिकसह काही निवडक ठिकाणी ‘हेलिकॉप्टर जॉयराइड सेवा (Helicopter Joyrides) देण्यासाठी ऑपरेटर नियुक्त करण्यासाठी आम्ही प्रस्ताव विनंती (आरएफपी) जारी केली आहे. आरएफपी सादर करण्याची अंतिम तारीख २५ जून आहे. आरएफपी २६ जून रोजी उघडले जाणार आहेत.” “जर ऑपरेटर्सना अंतिम स्वरूप देण्यात आले, तर एमटीडीसीच्या नाशिक ग्रेप पार्क रिसॉर्टमधील जॉयराइड सेवा ३ महिन्यांत सुरू होतील, असं बोललं जातंय.

हेलिकॉप्टर जॉयराइड म्हणजे काय?

हेलिकॉप्टर जॉयराइड म्हणजे मनोरंजनासाठी किंवा पर्यटनासाठी हेलिकॉप्टरमधून केली जाणारी छोटी उड्डाण. यामध्ये प्रवासी हेलिकॉप्टरमधून शहर, निसर्ग, किनारपट्टी किंवा एखाद्या विशिष्ट ठिकाणाच्या वरून हवाई दृश्यांचा आनंद घेतात. ही उड्डाणे साधारणपणे काही मिनिटांपासून ते एक तासापर्यंत असतात आणि ती रोमांचक अनुभवासाठी किंवा खास प्रसंगांसाठी आयोजित केली जातात.