Hello Krushi Shop : हॅलो कृषीने सुरु केले स्वतःचे Organic Shop; पुणे मुंबईतही मिळणार होम डिलिव्हरी

Hello Krushi Shop
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Hello Krushi Shop। शेतीविषयी माहिती आणि सेवा देणाऱ्या हॅलो कृषीने आणखी एक पाऊल पुढे टाकलं आहे. हॅलो कृषीने आता ई कॉमर्स व्यवसायात उडी घेतली आहे. काल महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त हॅलो कृषीने आपलं ‘हॅलो कृषी शॉप’ चे लॉन्चिंग केलं आहे. हॅलो कृषी शॉप हे शेतकरी आणि ग्राहक यांच्यातील महत्वाचा दुवा म्हणून काम करेल. हॅलो कृषी शॉपच्या माध्यमातून Organic, Honest, Pure गोष्टी ग्राहकांना मिळणार आहे. एकीकडे शेतकऱ्याच्या मालाला न्याय आणि दुसरीकडे ग्राहकांना दर्जेदार माल उपलब्ध करून देणे असं सूत्र हॅलो कृषी शॉपचे राहणार आहे. पुणे मुंबईसारख्या शहरातही ग्राहकांना या शॉपच्या माध्यमातून सेवा मिळणार आहे.

यावेळी हॅलो कृषीचे संस्थापक आदर्श पाटील यांनी म्हंटल कि, शेतकऱ्याला आपण जगाचा पोशिंदा म्हणतो. जगाचं पोट शेतकरी भरतो म्हणून त्याला आपण बाप म्हणतो. आज महाराष्ट्र कृषी दिनी या शेतकरी बापाचे हित पाहणाऱ्या हॅलो कृषी शॉप या इ कॉमर्स प्लॅटफॉर्मचे उदघाटन (Hello Krushi Shop) माझे वडील दीपक पाटील यांच्या हस्ते झाले. जमिनीतून अन्न उगवण्यासाठी घाम गाळणाऱ्याला त्याच्या कष्टाचा योग्य मोबदला मिळाला आणि ते विकत घेणाऱ्याला चांगल्या दर्जाचं अन्न मिळालं तर या जगातील अनेक समस्या सुटू शकतात. कारण आरोग्य आणि गरिबी या जगातील मोठ्या समस्या आहेत आणि हॅलो कृषी शॉप “शेतकऱ्याला न्याय आणि ग्राहकांना विश्वास” याच विचाराला मध्यभागी ठेऊन सुरु झाले आहे.

हॅलो कृषीच्या माध्यमातून तब्बल ८ लाख शेतकरी जोडले गेले आहेत. अडीच लाख एक्कर शेतीची नोंदणी हॅलो कृषीकडे आहे. हॅलो कृषीवर शेतकऱ्यांनी दाखवलेला हा विश्वास आहे. आता पुढची स्टेप म्हणून आम्ही ई प्लॅटफॉर्म क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला आणि हॅलो कृषी शॉप हे ऑनलाईन प्लॅटफॉर्म लाँच केलं आहे. shop.hellokrushi.com च्या माध्यमातून Organic, Honest, Pure गोष्टी आपल्याला मिळणार आहेत. हॅलो कृषी वरून खरेदी म्हणजे शेतकऱ्याच्या घामाला न्याय आणि तुमच्या पैशाला मूल्य…. आम्ही हॅलो कृषी शॉपच्या माध्यमातून (Hello Krushi Shop) एकीकडे शेतकऱ्यांच्या मालाला सुद्धा भाव देईन आणि दुसरीकडे ग्राहकांनाही दर्जेदार माल मिळेल याची ग्वाही आदर्श पाटील यांनी यावेळी दिली.

हॅलो कृषी मध्ये काय काय मिळणार? Hello Krushi Shop

हॅलो कृषीने मालाची शुद्धता आणि पारदर्शकता याला महत्व दिले आहे. त्यानुसार, सुरुवातीला ताजी फळे आणि भाज्या, तांदूळ, तूप आणि तेल, डाळी, धान्ये, गोड पदार्थ, मीठ तसेच लोणचे, बागकामाची साधने आणि रोपे, जंगली मध, सेंद्रिय गूळ , लाकडी घाण्याचे तेल यांसारख्या गोष्टी मिळतात. सर्व काही सेंद्रिय पद्धतीने पिकवलेले पदार्थच हॅलो कृषी शॉप वर उपलब्ध आहेत. त्यासाठी आमची अधिकृत वेबसाईट shop.hellokrushi.com ला भेट द्या आणि दर्जेदार पदार्थ खरेदी करून आरोग्याची काळजी घ्या.