Hepatitis | कोरोनापेक्षाही धोकादायक आहे हा आजार; रोज 3,500 लोकांचा जातोय बळी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मागील काही वर्षांपूर्वी कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातलेले होते. या कोरोनाच्या महामारीतून आता कुठे जग सावरताना दिसत आहे. तर अशातच हेपटायटीस (Hepatitis) या रोगाने त्याचे डोके वर काढलेले आहे. त्यामुळे संपूर्ण जगात आता डोकेदुखी वाढलेली आहे. हेपटायटिस हे जगातील मृत्यूचे दुसरे प्रमुख संसर्गजन्य कारण बनलेले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या 2024 च्या रिपोर्टनुसार या आजारामुळे 2022 मध्ये 1.3 दशलक्ष लोकांचा मृत्यू झालेला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने डाटा सादर केलेला आहे. त्या डेटानुसार या व्हायरसमुळे मृत्यू झाल्याचे अंदाजे संख्या 2019 मध्ये 1.1 दशलक्ष होती, तर ती वाढून 2022 मध्ये 1.3 दशलक्ष झालेली आहे. यामुळे दिवसभरात जवळपास 3500 लोकांचा मृत्यू होत आहे

जागतिक आरोग्य संघटनेने याबद्दल माहिती दिलेली आहे. याबद्दल त्यांनी सांगितले की, हे हेपटायटीस (Hepatitis) संसर्गमुळे मृत्यूची संख्या सध्या वाढत चाललेली आहे. हा रोग जगभरात पसरलेला आहे. जगभरातील 1.3 दशलक्ष लोकांच्या मृत्यूसाठी हा आजार कारणीभूत ठरलेला आहे. हा क्षयरोग सारख्या रोगाच्या समान श्रेणीमध्ये येतो.

मृत्यूचे प्रमाण किती ?

जागतिक आरोग्य संघटनेच्य रिपोर्टमध्ये सांगितल्याप्रमाणे या वायरसमुळे मृत्यूंची संख्या 2019 मध्ये 11 लाखांवरून 2022 मध्ये ते 13 लाखांपर्यंत पोहोचलेली आहे. यांपैकी 83% मृत्यू हेपटायटीस बी आणि 17 टक्के मृत्यू हा हेपटायटीस सी मुळे होतो. या संसर्गामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी जागतिक स्तरावर नवनवीन शोध लागत आहेत. परंतु या व्हायरसमुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या अजूनही वाढत चाललेली आहे.

या अहवालात म्हटलेले आहे की, या रोगाचे निदान आणि उपचार करण्यासाठी चांगली उपकरणे देखील उपलब्ध झालेली आहेत.त्यांच्या किमती देखील कमी होत आहेत. परंतु चाचणी आणि उपचार यांचे दर वाढलेले नाहीत. त्याचप्रमाणे जागतिक आरोग्य संस्था देखील सर्व देशांना शक्य असेल ती मदत करण्यास तयार आहे.

2019 मध्ये ज्या रोगाची जी प्रकरणी होती, त्या प्रकरणांमध्ये किंचित घट झालेली दिसत आहे. बांगलादेश, चीन, भारत, इंडोनेशिया, नायजेरिया, पाकिस्तान, व्हिएतनाम, रशियन फेडरेशन यांसारख्या देशांमध्ये हिपटायसिस बी आणि सीच्या संक्रमणाची अनेक प्रकरणी समोर आलेली आहेत. या रोगावर जेनेरिक हेपटायटीसची औषधे उपलब्ध आहेत, तरी देखील अनेक देश औषधे कमी किमतीत खरेदी करण्यास अपयशी ठरत आहे. अशी माहिती आरोग्य संस्थेने दिलेली आहे.