Hero Bike Price Hike : Hero च्या बाईक- स्कुटर महागल्या; कंपनीचा ग्राहकांना ‘दे धक्का’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Hero MotoCorp ही देशातील सर्वात लोकप्रिय आणि आघाडीची दुचाकी उत्पादक कंपनी आहे. देशात सर्वात जास्त दुचाकी Hero MotoCorp च्याच पाहायला मिळतात. चालवायला अतिशय सोप्पी आणि नवनवीन फीचर्सने सुसज्ज असल्याने हिरोच्या गाड्या खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल सुद्धा मोठा असतो. मात्र आता कंपनीने आपल्या ग्राहकांना दणका दिला आहे. येत्या 1 जुलै 2024 पासून हिरोच्या गाड्यांच्या किमती वाढवण्याचा (Hero Bike Price Hike) निर्णय कंपनीने घेतला आहे. त्यामुळे नवीन वाहन खरेदीदारांना आर्थिक फटका बसणार आहे.

का वाढल्या गाड्यांच्या किमती? Hero Bike Price Hike

याबाबत Hero MotoCorp ने माहिती दिली आहे की कंपनी 1 जुलै 2024 पासून त्यांच्या बाईक आणि स्कूटरच्या किमती वाढवणार आहे. कंपनी जुलै 2024 पासून तिच्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट असलेल्या सर्व बाइक्स आणि स्कूटरच्या एक्स-शोरूम किमती वाढवणार आहे. या किमती 1500 रुपयांपर्यंत वाढवण्यात येतील. मात्र प्रत्येक मॉडेल आणि व्हेरियंटच्या किमती एकसारख्या वाढवल्या जाणार नाहीत तर वेगवेगळ्या मॉडेल नुसार वाढलेल्या किमती सुद्धा वेगवेगळ्या असतील असं कंपनीने स्पष्ट केलं आहे. अचानकपणे गाड्यांच्या किमती वाढवण्याचे (Hero Bike Price Hike) मुख्य कारण म्हणजे इनपुट कॉस्टचा खर्च वाढत आहे त्यामुळे या वाढलेल्या खर्चाचा बोजा कंपनी आपल्या ग्राहकांवर टाकणार आहे.

Hero MotoCorp ने सध्या Splendor+, Splendor + Xtec, Splendor+ Xtec2.0, HF Deluxe, HF100, Glamour, Passion, Xpulse 200T 4V बाईक भारतीय बाजारपेठेत आणल्या आहेत. यासोबतच, कंपनी Destini Prime, Pleasure+ Xtec18, Xoom, Destini 125Xtec सारख्या स्कूटरची सुद्धा विक्री करते. दरम्यान, Hero MotoCorp शेअर्समध्ये आज चांगलीच वाढ झाल्याचे पाहायला मिळालं. आज सोमवारी दुपारी मुंबई शेअर बाजारात कंपनीचे शेअर्स 0.68 टक्क्यांच्या वाढीसह 5,489.05 रुपयांवर व्यवहार करताना दिसले.