Hero Xoom Combat Edition : Hero Xoom चे कॉम्बॅट एडिशन लाँच; पहा काय खास फीचर्स मिळतात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकप्रिय ऑटोमोबाईल कंपनी Hero MotoCorp ने भारतीय बाजारात Hero Xoom चे नवीन व्हेरिएंट लाँच (Hero Xoom Combat Edition) केलं आहे. या नव्या मॉडेलला कॉम्बॅट एडिशन असं नाव देण्यात आलं असून तिची रचना फायटर जेट्सपासून प्रेरित आहे. ग्रे आणि काळ्या अशा मिक्स रंगात हिरो ची हि बाईक दिसतेय. तसेच तिचा लूक सुद्धा अतिशय स्पोर्टी आहे. देशभरातील तरुणांना आकर्षित करण्यासाठी अशा प्रकारचा लूक देण्यात आल्याचे बोललं जात आहे. आज आपण हिरो Xoom च्या या नव्या मॉडेलचे खास फीचर्स आणि स्पेसिफिकेशन जाणून घेऊयात…

Hero Xoom च्या कॉम्बॅट एडिशन मध्ये 110.9 cc, एअर-कूल्ड इंजिन बसवण्यात आलं आहे. हे इंजिन CVT गिअरबॉक्सला जोडण्यात आले असून ते 7,250rpm वर 8.05bhp मॅक्सिमम पॉवर आणि 5,750rpm वर 8.7Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. आधीच्या ZX मॉडेलमध्ये जे काही फीचर्स देण्यात आले होते तेच सर्व फीचर्स कॉम्बॅट एडिशनमध्येही (Hero Xoom Combat Edition) ग्राहकांना मिळतात. यामध्ये प्रोजेक्टर एलईडी हेडलॅम्प, एक संपूर्ण डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, कॉर्नरिंग लाइट्स, एल-आकाराचे एलईडी डीआरएल, 12-इंच डायमंड-कट अलॉय व्हील आणि यूएसबी मोबाइल चार्जिंग पॉइंट अशा काही फीचर्सचा समावेश आहे.

किंमत किती? Hero Xoom Combat Edition

Hero Xoom च्या कॉम्बॅट एडिशनची किंमत हि आधीच्या ZX व्हेरियंटपेक्षा थोडीशी जास्त आहे. या अपडेटेड स्कुटरची किंमत 80,967 रुपये आहे.तर Zoom ZX व्हेरिएंटची किंमत 79,967 रुपये होती. म्हणजेच किमतीत थोडाफार फरक पाहायला मिळत आहे. भारतीय बाजारात हिरोची ही स्कुटर Honda Dio, Honda Activa यासारख्या गाडयांना थेट टक्कर देईल.