हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Hidden Beach In Mumbai) मुंबई म्हणजे धावतं शहर. कोणासाठीही आणि कशासाठीही न थांबणाऱ्या मुंबईचे रहिवाशी कायम घड्याळाच्या काट्यावर धावत असतात. रस्त्यावर वाहनांचा गोंगाट आणि मनात अस्वस्थतेचे वादळ घेऊन मुंबईकर सतत गडबडीत दिसतो. अशा धावपळीतून एखादा निवांत क्षण मिळावा असे एखाद्या मुंबईकराला वाटले तर त्यात काही चूक ठरणार नाही. पण हा निवांतपणा मुंबईत मिळणार कुठे? तर आज आम्ही तुम्हाला मुंबईजवळील एका छुप्या समुद्रकिनाऱ्याबद्दल सांगणार होते. जो मुंबईजवळ असूनही अत्यंत शांत आणि निवांत आहे. चला तर या समुद्रकिनाऱ्याविषयी जाणून घेऊया.
कुठे आहे? (Hidden Beach In Mumbai)
मुंबईकरांना निवांतपणा अनुभवायचा असेल मुंबईच्या अगदी जवळ असलेलय कळंब बीचला एकदा जरूर भेट द्या. हा समुद्र किनारा नालासापोरा स्टेशनपासून काही अंतरावर आहे. हे ठिकाण फारसे कुणाला माहित नसल्यामुळे इथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या बरीच कमी आहे. मुंबईजवळील अत्यंत सुंदर आणि आकर्षक असा हा समुद्र किनारा नालासोपारा पश्चिम येथील कळंब गावात आहे. कळंब गावाची हद्द संपताच हा समुद्र किनारा सुरु होतो. या किनाऱ्यावर कांदळवन आणि छोटसं सुरुचं बनसुद्धा आहे. जे पहायला फारच सुंदर आहे.
कळंब समुद्र किनाऱ्यावरची वाळू चंदेरी रंगाची आणि समुद्राचे पाणी स्वच्छ निळेशार आहे. (Hidden Beach In Mumbai) हा समुद्र किनारा फिरताना मनावरील ताण आपोआपच हलका होऊ लागतो. एका बाजूला वसईचे दृष्य तर दुसऱ्या बाजूला डहाणू, पालघरचे समुद्र किनारे दिसतात. तसेच या समुद्रकिनाऱ्यावरून सनसेट पाहणे अत्यंत लोभसवाणे आहे.
कसे जाल?
जर तुम्ही शॉर्ट पिकनिकचा विचार करत असाल तर हा बीच फिरायला नक्की जा. नालासोपारा पश्चिम येथील कळंब गावात हा सुंदर समुद्र किनारा आहे. त्यामुळे इथे जाण्यासाठी तुम्हाला पश्चिम रेल्वे मार्गावरील नालासोपारा रेल्वे स्थानाकात उतरावे लागेल. रेल्वे स्थानकातून पश्चिमेला बाहेर पडल्यानंतर कळंब हे गाव आहे. (Hidden Beach In Mumbai) रेल्वे स्टेशनबाहेरुन कळंब गावात जाण्यासाठी वसई विरार परिहवन सेवा उपलब्ध आहे. शिवाय रिक्षानेदेखील इथे जाता येईल. शिवाय तुमची गाडी असेल तर तुम्ही थेट गाडीने सुद्धा इथे जाऊ शकता.