High Cholesterol Symptoms : तुमचं कोलेस्ट्रॉल वाढलंय?? कसं समजेल? ‘ही’ गंभीर लक्षणे देतात संकेत

High Cholesterol Symptoms
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (High Cholesterol Symptoms) रोजच्या दगदगीत आपण आपल्या आरोग्याकडे कुठे ना कुठे लक्ष द्यायला कमी पडतोय, याची जाणीव होईपर्यंत आपण विविध आजारांचे शिकार झालेलो असतो. सद्यपरिस्थितीबद्दल बोलायचं झालं तर, बदलत्या काळानुसार प्रत्येकाची जीवनशैली बदलत चालली आहे. मात्र, वाईट एकाच गोष्टीचं वाटतं की,बदलणारी जीवनशैली आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक सिद्ध होते आहे. कामाचा- कौटुंबिक गोष्टींचा वाढणारा ताण आणि त्यात चुकीच्या सवयी आरोग्याची वाट लावण्यासाठी पुरेशा आहेत. हृदय विकार, स्ट्रोक, श्वसन विकार, मानसिक अस्थैर्य, लठ्ठपणा अशा अनेक समस्यांनी आज बरेच लोक त्रासलेले आहेत.

यातील कितीतरी समस्यांचे कारण वाढते कोलेस्ट्रॉल आहे. आजची तरुण पिढी या वाढत्या कोलेस्ट्रॉलच्या समस्येची मोठी झाली आहे. केवळ लठ्ठ नव्हे तर शरीरयष्टीने बारीक असणाऱ्या लोकांमध्ये सुद्धा वाढते कोलेस्ट्रॉल इतर आरोग्यविषयक समस्या निर्माण करत आहे. (High Cholesterol Symptoms) कितीतरी लोकांना आपल्या शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढली आहे किंवा वाढते आहे याचा वेळीच सुगावा लागत नाही. परिणामी, अनेक वेळा शिरा पूर्णपणे बंद होईपर्यंत कोलेस्ट्रॉलची पातळी वाढत जाते आणि त्यानंतर ब्लॉकेजेस, हार्ट अटॅकचा धोका वाढतो. अशा वाढत्या कोलेस्ट्रॉलची काही लक्षणे असतात. जी माहित नसल्यामुळे पुढे जाऊन पश्चातापाची वेळ येते. म्हणूनच आज आपण उच्च कोलेस्ट्रॉलची लक्षणे जाणून घेणार आहोत.

स्नायूंमध्ये वेदना होणे (High Cholesterol Symptoms)

अनेकदा आपल्याला अचानक हात, पाय दुखण्याची समस्या जाणवते. कित्येकदा असह्य वेदना होतात. ज्यांचे कारण आपल्याला माहित नसते. तर याचे कारण उच्च कोलेस्ट्रॉल असू शकते. जेव्हा आपल्या शरीरात प्लेक जमा होतो तेव्हा, ते रक्तवाहिन्यांना अवरोधित करते. या स्थितीला वैद्यकीय भाषेत ‘एथेरोस्क्लेरोसिस’ असे म्हणतात. आपल्या शरीरात कोलेस्टेरॉलची पातळी वाढल्याने रक्त वाहिन्यांवर परिणाम होतो. परिणामी स्नायूंमध्ये वेदना होऊ शकतात. ज्यामुळे हात, पाय, खांदे ते अगदी बोटंसुद्धा दुखू शकतात.

अंग थरथरणे किंवा बधीरपणा येणे

बऱ्याचदा उच्च कोलेस्ट्रॉलच्या रुग्णांमध्ये अंग थरथरणे आणि बधीरपणाची समस्या येऊ शकते. कारण कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्याने शरीराच्या काही भागांमध्ये रक्ताभिसरणात अडथळे निर्माण होतात. (High Cholesterol Symptoms) परिणामी, अंगात थरकाप भरणे आणि काही प्रकरणांमध्ये बधीरपणा जाणवू शकतो. या परिस्थितीत उच्च कोलेस्ट्रॉल रक्तप्रवाहात रोख आणतो आणि अशावेळी दुर्लक्ष करणे महागात पडू शकते.

नखं पिवळी पडणे

जर तुमच्या शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढली असेल तर एक महत्वाचे लक्षण जे लगेच दिसून येते ते म्हणजे नखांचा रंग पिवळा बदलणे. उच्च कोलेस्ट्रॉलमुळे नखांचा रंग बदलून पिवळा होऊ शकतो. (High Cholesterol Symptoms) हा संकेत तुमच्या शरीरातील खराब रक्त परिसंचरण असल्याचे सांगतो. उच्च कोलेस्ट्रॉलचे हे महत्वाचे लक्षण असून अशा परिस्थितीत लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

नखांना तडा जाणे

उच्च कोलेस्ट्रॉलच्या काही प्रकरणांमध्ये नखांची वाढ थांबते. इतकेच नव्हे तर कोलेस्ट्रॉलची पातळी जसजशी वाढत जाते तसतसा तुमच्या नखांचा रंगबदलत जातो आणि काही प्रकरणांमध्ये नखांना तडादेखील जाते. (High Cholesterol Symptoms) अशावेळी डॉक्टरांकडून तपासणी करून घेऊन लवकरात लवकर उपचार सुरु करणे गरजेचे आहे हे लक्षात घ्या.