इतर सर्व क्षेत्राप्रमाणे शेती क्षेत्रात देखील तंत्रज्ञाने उडी घेतली आहे. मग ते शेतामधील इरिगेशन असुदे किंवा शेतामध्ये ड्रोनची फवारणी असुदे. महाराष्ट्रात सुद्धा शेती आणि शेती पूरक व्यवसाय तंत्रज्ञानाच्या मदतीने भरारी घेऊ लागले आहेत. आजच्या लेखात आपण अशाच एका ध्यायवेडया तरुणाविषयी आणि त्याच्या कार्याविषयी माहिती घेणार आहोत.
हायटेक पोल्ट्रीफार्म
पोल्ट्री व्यवसायातलं सर्वात मोठं आव्हान म्हणजे पोल्ट्री फार्म मधलं तापमान नियंत्रित ठेवणं. हे तापमान योग्य नसेल तर त्याचा परिणाम कोंबड्यांच्या आरोग्यावर होऊन त्या दगावतात. शिवाय इथली स्वच्छता राखणं योग्य नियोजन ठेवणे या गोष्टी आल्याच. पण पारंपरिक पोल्ट्री व्यवसायात उतारण्यापेक्षा सुशांतने आधुनिक पोल्ट्री व्यवसायात उतरायचं ठरवलं. अर्थात हे सोपं नव्हतं. यासाठी पैसा, प्रचंड मेहनत आणि संयम या सगळ्याची गरज होती.
सर्व गोष्टींचा अभ्यास करून त्याने हा अत्याधुनिक प्लँट उभाराचे ठरवले. या फार्मचे काम तब्बल 11 महिने चालले…
यासाठी लागणारे काही भाग देशातून तर काही भाग जर्मनीहून मागवले. आता त्याचं स्वात:चं हायटेक ‘प्लॅटिनम’ नावाचं पोल्ट्री फार्म दिमाखात सुरु असून यामध्ये कोणतेही अँटिबायोटिक्स किंवा इतर औषधे पक्षांना न देता ३५ दिसांमध्ये २. ५ किलो पर्यंत निरोगी पक्षी तयार होतात. विशेष म्हणजे हे पोल्ट्री फार्म पूर्णपणे ऍटोमॅटिक असून यामध्ये तापमान देखील आपल्याला हवे तसे सेट करता येते. एवढेच काय या मध्ये पक्षांची स्वच्छता सुद्धा योग्य पद्धतीने राखता येते.
परदेशी पाहुण्यांनाही भुरळ
खरंतर बाहेरील देशातील कृषी तंत्रज्ञान समजावे म्हणून महाराष्ट्रातील शेतकरी बाहेरच्या देशात कृषी दौरा करतात. मात्र आता रशियासारख्या प्रगतशील देशातील शेतकरी सुद्धा महाराष्ट्रातील व्यवसायांना भेटी देण्यास येत आहेत. होय, करमाळा तालुक्यातील केम येथे उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक पोल्ट्री फार्मला रशियन व्यावसायिक झोटोव्ह पावेल यांनी भेट दिली आहे.यापूर्वी देखील अंधरप्रदेश,तमिळनाडू, कर्नाटक, तेलंगणा,ओडिशा,बिहार, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश इत्यादी राज्यातील व देशाच्या काना कोपऱ्यातील लोकांनी भेटी दिल्या आहेत