Highway आणि Expressway मध्ये नेमका काय फरक असतो?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या भारतात अनेक ठिकाणी मोठं मोठे रस्ते बांधले जात आहेत. त्यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न कुठेतरी शमवला जात आहे. तसेच सध्या समृद्धी महामार्गाचे कामही मोठ्या जलद गतीने होताना दिसून येत आहे. भारतात अनेक हायवे आणि एक्सप्रेसवे आहेत. परंतु तुम्हाला कधी हा प्रश्न पडला आहे का? की, हायवे आणि एक्स्प्रेसवे या दोन्हीतील फरक काय असतो? चला तर मग आपण तेच जाणून घेऊयात.

काय असतो दोन्ही मधला फरक?

Highway आणि Expressway मधील एक्स्प्रेसवे म्हणजे जो रस्ता 6 ते 8 लेनचा बांधलेला असतो. त्यास द्रुतगती मार्ग किंवा एक्स्प्रेसवे असे म्हणतात. ह्या मार्गाला एन्ट्री आणि एक्सिट पॉईंट असतो. तसेच तो उच्च मार्ग म्हणून ओळखलं जातो. या मार्गांवर टू – व्हीलर वाहणांना धावण्याची परवानगी नसते. जलदगती वाहणासाठी हा एक्सप्रेसवे असतो. तसेच एक्सप्रेसवेवर चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी स्वतंत्र रॅम्प म्हणजेच एन्ट्री आणि एक्सिट पॉईंट बनवलेले असतात. तर हायवेला एन्ट्री आणि एक्सिट पॉईंट नसतात. तसेच ते २ ते ४ लेनचे बांधलेले असतात. तसेच इतर कमी गतीच्या वाहणांना यावर धावण्याची परवानगी असते. त्यामुळे अधिक वापर हा हायवेचा होतो असे म्हणायला हरकत नाही.

का बांधले जातात Expressway आणि Highway ?

एक्स्प्रेसवे आणि हायवे बांधल्यामुळे वाहतुकीस चालना मिळते. एवढेच नाही तर हे रस्ते यासाठी बांधले जातात कारण हायवे दोन गावांना आणि दोन शहरांना जोडण्यासाठी उपयुक्त ठरतात. त्यासाठी ते उभारले जातात. तर एक्स्प्रेसवे हे दोन ठिकाणातील किंवा शहरातील अंतर कमी करण्यासाठी उपयुक्त असतात. त्यामुळे मालवाहू वाहतूक जलद गतीने होते आणि आर्थिक फायदाही होतो.