Himachal Pradesh Cloud Burst : हिमाचलमध्ये ढगफुटी!! माणसे- घरे गेली वाहून; Video पाहून थरकाप उडेल

Himachal Pradesh Cloud Burst
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हिमाचल प्रदेशात ढगफुटी झाली आहे. पावसाच्या हाहाकारामुळे महापूर आला आहे. मंडी जिल्ह्यात निसर्गाने अक्षरशः कहर केला आहे. जिल्ह्यातील धरमपूर, गोहर, बागस्यद, पांडोहसह सराजच्या अनेक भागात अचानक पूर आला आहे. या पुरात अनेक गाड्या, घरे आणि माणसेही वाहून गेल्याच बोललं जातंय. सोमवारपासून याठिकाणी धुव्वाधार पाऊस सुरु असून नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे. जिल्हा प्रशासनाने प्रभावित क्षेत्रामध्ये शक्य त्या सर्व मार्गांनी मदतकार्य पोहोचवण्यास सुरूवात केली असून, जोखमीच्या भागांमध्ये बचावकार्यसुद्धा सुरू केलं आहे.

261 रस्ते बंद – Himachal Pradesh Cloud Burst

सोमवारी सकाळी हिमाचल प्रदेशातील मंडी आणि कुल्लू राष्ट्रीय महामार्गावरील एका बोगद्याजवळ भूस्खलन झाले. त्यामुळे अनेक वाहने पाच तास बोगद्यात अडकली होती. मुसळधार पावसाच्या इशाऱ्यामुळे हिमाचल प्रदेशातील चार जिल्ह्यांमध्ये शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. आज मंडी जिल्ह्याने सकाळी ९ वाजता एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. जिल्ह्यात २६१ रस्ते बंद झाल्याचे सांगण्यात आले आहे, तर १७०० हून अधिक ट्रान्सफॉर्मर काम करणे थांबवले आहेत. जिल्ह्यातील अनेक उपविभागांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणे घरे वाहून गेली आहेत, अनेक लोक बेपत्ता झाली आहेत. रस्ते बंद आहेत. दळणवळण व्यवस्था खोळंबली आहे. काही गावांशी संपर्क पूर्णपणे तुटला असून, काही भागांचा विजपुरवठासुद्धा खंडित झाला आहे. त्यातच भर म्हणजे हवामान विभागानं पुढील 24 तासांमध्ये हिमाचलमध्ये मध्यम ते जोरदार स्वरुपातील पावसाची शक्यता वर्तवल्यानं स्थानिक प्रशासन सध्या सतर्क असल्याचं पाहायला मिळत आहे.

दरम्यान, जिल्हा प्रशासनाने प्रभावित क्षेत्रामध्ये (Himachal Pradesh Cloud Burst ) शक्य त्या सर्व मार्गांनी मदतकार्य पोहोचवण्यास सुरूवात केली आहे. आतापर्यंत मंडी शहरातील विविध भागातून ११ जणांना वाचवण्यात आले आहे. प्रशासन सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. उपायुक्त मंडी अपूर्व देवगण स्वतः बारा, तलवाडा आणि इतर बाधित भागांना भेट देऊन मदत कार्याचा आढावा घेत आहेत. राज्यातील पर्यटकांनासुद्धा सुरक्षित स्थळी थांबण्याचा सल्ला देण्यात आला आहे.