HMPV Virus : ची महाराष्ट्रात एंट्री ; ‘या’ शहरात आढळले 2 रुग्ण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

HMPV Virus : कोरोनाच्या धक्क्यातून अजूनही लोक सावरले नाहीत तोपर्यंत आणखी एका व्हायरस ने धडकी भरवली आहे. लहान मुलांच्यात वेगाने पसरणाऱ्या HMPV ने भारतात सुद्धा एंट्री केली आहे. एवढेच नाही तर महाराष्ट्रातील नागपूर शहरात या व्हायरस (HMPV Virus)चे दोन रुग्ण आढळून आले आहेत.

नागपूरच 7 आणि 13 वर्षांच्या मुलांना या व्हायरसची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना या आधी स्वाईन फ्लू झाला होता त्यानंतर 3 जानेवारी रोजी पीसीआर टेस्ट केल्यानंतर या दोन्ही मुलांना एचएमटीव्ही व्हायरसची लागण झाल्याची माहिती आता समोर आली आहे त्यामुळे महाराष्ट्रात या व्हायरस ने एन्ट्री केली आहे.

देशात आतापर्यंत 7 जण या विषाणूचे बळी ठरले आहेत. केंद्र सरकारचे म्हणणे आहे की प्रकरणांमध्ये वाढ झाल्याने कोविड सारखी परिस्थिती निर्माण होणार नाही. बेंगळुरू, नागपूर आणि तामिळनाडूमध्ये प्रत्येकी दोन आणि अहमदाबादमध्ये एक प्रकरण दाखल करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री फडणवीसांकडून आवाहन

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही लोकांना एचएमपीव्ही विषाणूबद्दल घाबरू नका असे आवाहन केले होते. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, हा विषाणू नवीन नाही, तो याआधीही दिसून आला आहे आणि आता पुन्हा एकदा त्याचा परिणाम दिसून येत आहे. सतर्क राहून काळजी घेण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. याबाबत आरोग्य खात्याकडूनही निवेदन जरी करण्यात आले असून योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

काय आहे HMPV ?

मानवी मेटापन्यूमोव्हायरस किंवा एचएमपीव्ही 2000 मध्ये सापडला. त्या वेळी डच शास्त्रज्ञांच्या गटाने मानवांमध्ये तीव्र श्वसन संक्रमणाची कारणे शोधण्याचा प्रयत्न केला. त्यांना अज्ञात रोगकारक सापडला होता. 2001 पर्यंत, डच शास्त्रज्ञांनी मेटापन्यूमोव्हायरस अनुक्रमित केले होते. नंतर, 28 मुलांच्या सेरोलॉजिकल अभ्यासातून (रक्ताच्या सीरमचे विश्लेषण) आणखी काही गोष्टी समोर आल्या. हा विषाणू 1958 पासून नेदरलँडमध्ये पसरत होता. याआधीही त्यांची संख्या वाढली होती. खरं तर, 2023 च्या पहिल्या महिन्यांत, यूएसने एचएमपीव्ही शोधात या विषाणूच्या सांक्रमणाच्या अधिक घटना आढळून आल्या.

काय घ्याल घाबरदारी ?

सर्दी, डोकेदुखी, ताप येणे, थंडी वाजून येणे , नाक गळणं, खोकला होणं, श्वास घ्यायला त्रास होणे आणि गंभीर लक्षणांमध्ये फुफुसांमध्ये संक्रमण होणे अशी या आजाराची लक्षणे आहेत.

या विषाणूचा इन्क्यूबेशन काळ साधारणपणे तीन ते सहा दिवसांचा असतो. परंतु आजारपणाचा कालावधी कमी-अधिक असू शकतो. हे संक्रमण किती गंभीर आहे, यावर अवलंबून आहे. हा नवीन विषाणू नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. 20 वर्षांपासून मानवांना याबद्दल माहिती आहे. हिवाळ्यात त्याच्या संसर्गाची प्रकरणे आढळतात. हे फ्लू विषाणूसारखे आहे.

जर एखाद्या व्यक्तीला या विषाणूची लागण झाली असेल किंवा कोणालाही सर्दी किंवा खोकला असेल तर सर्वप्रथम त्याच्यापासून अंतर ठेवा. त्यानंतर त्याला डॉक्टरांकडे न्या. सर्दी आणि खोकल्याचा त्रास असलेल्या व्यक्तीला मास्क घालण्यास सांगा.खोकताना किंवा शिंकताना तोंडाला रुमाल किंवा मास्कने झाका. आपले हात वारंवार साबणाने धुवा आणि चेहऱ्याला हात लावू नका.सर्दी, खोकला असल्यास मास्क लावा आणि घरी आराम करा. त्याच भांड्यातून दुसऱ्याने खाऊ नये.