Holi 2023 : होळी खेळताना काय करावं अन् काय करू नये? ‘अशी’ घ्या काळजी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण भारतात होळीचा (Holi 2023) सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दरवर्षी फाल्गुन मासातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला संध्याकाळपासून होळीचा सण सुरू होतो. सर्वप्रथम होलिका दहन संध्याकाळी केले जाते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी एकमेकांवर रंगांची उधळून करून अत्यंत थाटामाटात होळी खेळली जाते. रंगाची उधळण करताना आरोग्याची आणि खास करून त्वचेची काळजी घेणं महत्त्वाचे आहे. कारण भेसळयुक्त रंगामुळे त्वचेचं नुकसान होऊ शकत.

होळीच्या रंगांमुळे चेहऱ्यावर खाज येणे, त्वचेवर जळजळ होणे यासह अनेक समस्या उद्भवू शकतात. रंगांमध्ये अनेक प्रकारची केमिकल्स आणि हानिकारक रसायने असल्याने डोळ्यांना ऍलर्जी होणं, श्वसनाचा त्रास होणं, त्वचेला जखम होणं अशा प्रकारच्या अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे या दिवशी विशेष काळजी घेणं महत्त्वाचे आहे.

जेव्हा तुम्ही होळी (Holi 2023) खेळण्यासाठी रंग खरेदी करायला बाजारात जाता तेव्हा रंगाचे पॅकेट नीट चेक करा. रंगामध्ये कोणकोणते घटक वापरले आहेत ते पहा. जर रंग बनवण्यासाठी गुलाब, हळद यांसारख्या घटकांचा वापर केला असेल तर समजून घ्या की तो नैसर्गिक रंग आहे. असे रंग खरेदी करा. परंतु जर रंग तयार करण्यासाठी सामग्रीमध्ये केमिकल वापरले गेले असेल तर रंग खरेदी करू नका.

होळी खेळत असताना काय करू नये –

1) होळी (Holi 2023) खेळताना डोळे, नाक, तोंड आणि जखमा असेल त्या भागात रंग लावू नका.
2) होळी खेळत असताना जवळ मोबाईल किंवा इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू ठेऊ नका.
3) शरीराला जर जास्त रंग लागला असेल तर तो काढण्यासाठी कधीही केरोसीन वापरू नका.
4) मुलांना पाण्याचे फुगे एकमेकांवर टाकू देऊ नका कारण यामुळे संसर्ग होण्याची शक्यता असते.

होळी खेळत असताना ‘हे’ करा – (Holi 2023)

1) होळी खेळत असताना पर्यावरणपूरक रंगाचा वापर करावा.
2) कोरडे रंग वापरून पाणी वाचवा.
3) एकमेकांवर रंग उधळण्यापूर्वी शरीराला तेल लावा.
4) चेहरा आणि हात यासारख्या उघड्या भागावर सनस्क्रीन लावा.
5) होळी खेळून झाल्यांनतर लगेच अंघोळ करा आणि स्वच्छ व्हा.