Holi 2024: फरशी आणि फर्नीचरवरचे रंग सुके असूद्यात किंवा ओले ; ‘या’ पद्धतीने करा चकाचक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Holi 2024 : सध्या होळी सुरु असल्याने सर्वत्र रंगीत माहोल असतो. लहान मुलांमध्ये तर हा सण म्हणजे निव्वळ धुमधडाका. त्यामुळे रंगांची हि उधळण घरात आल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे फरशी, फर्नीचर, सोफा अशा वस्तूंवर रंगाचा अक्षरश: सडा पडतो. मग हे डाग काढणे म्हणजे तारेवरची कसरत होऊन जाते. म्हणूनच आजच्या लेखात आम्ही काही खास टिप्स घेऊन आलो आहोत ज्यामुळे हे रंग नाहीसे होतील. चला तर मग जाणून घेऊया …

कोरड्या रंगासाठी

घरात जर फरशीवर कोरडा रंग सांडला असेल तर तो आधी झाडून घ्या आणि नंतर कोरड्या कपड्याने पुसून घ्या. सोफ्यावर जर कोरडा रंग सांडला असेल तर तो मात्र वॅक्यूम क्लिनरने स्वच्छ करा.

ओला किंवा पक्का रंग असल्यास

फरशीवर किंवा भिंतींवर ओला आणि पक्का रंग पडला असेल तर तो ओला असताना लगेच पुसून घ्या. जर रंग वाळलेला असेल तर मात्र त्या रंगाच्या डागावर सुरुवातीला बेकिंग सोडा घातलेलं गरम पाणी टाका. ते पाणी १० ते १५ मिनिटे तसंच राहू द्या. त्यानंतर एखादा ओला कपडा घेऊन डाग पुसून टाका.

फर्निचर आणि इतर वस्तू

लाकडी फर्निचर किंवा प्लास्टिकच्या वस्तूंवर ओला- पक्का रंग सांडला असेल तर तो काढून टाकण्यासाठी तुम्ही नेलपेंट रिमुव्हरचाही वापर करू शकता.

सोफा ओला झाल्यास

सोफ्यावर पडलेले ओल्या रंगाचे डाग काढण्यासाठी व्हिनेगर वापरून पाहा. डेटॉल लावूनही सोफ्यावरचे रंगांचे डाग निघू शकतात.