Holi 2024 : होळीचा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. होळीला अनेकजण आपल्या घरी जातात. चाकरमानी आपल्या गावाची वाट धरतात. प्रवाशांची संख्या लक्षात घेता रेल्वेने खास सोय करत जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र रेल्वेकडून काही गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नक्की कोणत्या गाड्या (Holi 2024) रद्द करण्यात आल्या आहेत जाणून घेऊया…
रेल्वेने सणासुदीच्या विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यंदा रेल्वेने गेल्या वेळेपेक्षा ५० टक्के अधिक होळी स्पेशल ट्रेन चालवण्याची घोषणा (Holi 2024) केली आहे. मात्र, या सगळ्यात गुजरात, महाराष्ट्र आणि राजस्थानकडे जाणाऱ्या काही प्रवाशांच्या अडचणी वाढल्या आहेत. 18 मार्च ते 22 मार्च दरम्यान यापैकी काही मार्गांवर अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
पश्चिम रेल्वेने एका प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, अहमदाबाद (Holi 2024) विभागातील गांधीधाम आणि गांधीधाम केबिनमधील नॉन-इंटरलॉकिंग कामामुळे, 19 मार्च 2024 ते 22 मार्च 2024 पर्यंत ब्लॉक घेण्यात आला आहे, ज्यामुळे गांधीधामला येणाऱ्या/जाणाऱ्या गाड्यांवर परिणाम होईल.
या 8 गाड्या रद्द (Holi 2024)
गाडी क्रमांक ०९४५६ भुज-गांधीनगर विशेष १९ ते २२ मार्च २०२४
गाडी क्रमांक ०९४५५ गांधीनगर-भुज विशेष १९ ते २२ मार्च २०२४
18 आणि 20 मार्च 2024 ची ट्रेन क्रमांक 22483 जोधपूर-गांधीधाम एक्सप्रेस
19 आणि 21 मार्च 2024 ची गाडी क्रमांक 22484 गांधीधाम-जोधपूर एक्सप्रेस
गाडी क्रमांक ०९४१६ गांधीधाम-वांद्रे टर्मिनस स्पेशल २१ मार्च २०२४
ट्रेन क्रमांक ०९४१५ वांद्रे टर्मिनस-गांधीधाम स्पेशल 21 मार्च 2024
21 मार्च 2024 ची गाडी क्रमांक 22952 गांधीधाम-वांद्रे टर्मिनस एक्सप्रेस
22 मार्च 2024 ची ट्रेन क्रमांक 22951 वांद्रे टर्मिनस-गांधीधाम एक्सप्रेस
अहमदाबादमधील गांधीधाम ते गांधीधाम केबिनमधील नॉन-इंटरलॉकिंग कामामुळे, 19 मार्च 2024 ते 22 मार्च 2024 या कालावधीत ब्लॉक घेण्यात आला आहे. या ब्लॉकमुळे गांधीधामकडे (Holi 2024) येणाऱ्या/जाणाऱ्या गाड्यांवर परिणाम होईल. प्रवाशांवर याचा ताण पडणार आहे.
21 मार्चच्या गाडी क्रमांक 09416 गांधीधाम-वांद्रे टर्मिनस स्पेशल, ट्रेन क्रमांक 09415 वांद्रे टर्मिनस-गांधीधाम स्पेशल, गाडी क्रमांक 22952 गांधीधाम-वांद्रे टर्मिनस एक्सप्रेस आणि 22 मार्चची ट्रेन क्रमांक 22951 वांद्रे टर्मिनस-गांधीधाम एक्सप्रेस
अंशतः रद्द झालेल्या गाड्या
18 मार्च 2024 पुण्यावरुन सुटणारी ट्रेन क्रमांक 11092 पुणे-भुज एक्स्प्रेस ट्रेन अहमदाबाद स्थानकावर शॉर्ट टर्मिनेट झाली. तर अहमदाबाद आणि भुज दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली.
20 मार्च 2024 रोजी भुज येथून निघणारी ट्रेन क्रमांक 11091 भुज-पुणे एक्स्प्रेस अंशतः रद्द (Holi 2024) करण्यात आली आहे.
पुढील गाड्यांचा मार्ग बदलला आहे. या गाड्या गांधीधाम स्टेशनवर जाणार नाहीत. या गाड्यांव्यतिरिक्त सर्व गाड्या आपला निर्धारित मार्ग केबनि-गांधीधाम-आदिपूर या मार्गावरुन जाताना गांधीधाम केबिन-आदिपूर मार्गावर थांबतील.