युवा फाउंडेशन घणसोली आणि शिवबा प्रतिष्ठान आयोजित भव्य होळी आणि धुलीवंदन कार्यक्रम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । घणसोली सेक्टर 21मध्ये युवा फाउंडेशन नेहमीच विविध कार्यक्रम आणि उपक्रमांचे आयोजन करीत असतात. दरवर्षी प्रमाणे सेक्टर 21 मधील सर्व रहिवाशी एकत्र यावे आणि एकोपा, सहकार्य, प्रेम, आपुलकी निर्माण व्हावी या हेतूने युवा फाउंडेशन आणि शिवबा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य होळी आणि धुलीवंदनाचा कार्यक्रमाचे आयोजन केले गेले.

होळी दहनाच्या कार्यक्रमास रबाळे पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री धुमाळ साहेब आणि नवी मुंबईचे एसीपी श्री गावडे साहेब हे उपस्थित होते. तसेच कार्यक्रम प्रसंगी शिवबा प्रतिष्ठान चे सर्वेसर्वा श्री राहुल लोखंडे आणि सहकारी उपस्थित होते. तसेच युवा फाउंडेशन कार्यकारणी मध्ये सांस्कृतिक समितीचे प्रमुख अध्यक्ष ॲड. सौ. सविता ठुबे सावंत मॅडम, सचिव श्री. दिगंबर खानदेशे, खजिनदार श्री. अमोल बनगर उपस्थित होते .

याशिवाय युवा फाउंडेशन प्रमुख कार्यकारणी मधील प्रमुख पदाधिकरी श्री. मच्छिंद्र पानसरे,श्री. सुनील कडू,श्री. प्रमोद लोंढे,श्री. मंगेश धोंडकर,श्री. हरिष फाळके,श्री. विनायक काळे, श्री. सावंत काका, श्री. नंदू खोडके, ॲड. सौ. पौर्णिमा काळे, सौ. प्रतिभा खानदेशे, सौ. अर्चना लोंढे, सौ. हर्षदा फाळके आदी सर्व मान्यवरांनी कार्यक्रम यशस्वी पणे पार पाडला. तसेच या विभागातील सर्व रहिवाश्यांनी एकत्र येऊन सदर कार्यक्रम खूप छान पार पडण्यास हातभार लावला.