Home Loan Charges : Home Loan घेताना बँकेला ‘हे’ चार्जेस द्यावे लागतात; कोणते? ते जाणून घेऊया

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Home Loan Charges) गेल्या काही काळात घराच्या किमतींनी मोठी उसळी घेतली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी घर घेण्याचं स्वप्न महागलं आहे. अशावेळी अनेक लोक गृह कर्जाचा पर्याय अवलंबून आपल्या हक्काचे घर खरेदी करतात. आपलं घर असावं असं कुणाला वाटत नाही? त्यामुळे गृह कर्ज हा पर्याय उत्तम आहे. जर तुम्हीही नवीन घराच्या खरेदीसाठी गृह कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे असं समजा. कारण आज आम्ही तुम्हाला गृह कर्जासंबंधित काही महत्वाची माहिती देणार आहोत. ज्यामुळे प्रोसेसिंग करतेवेळी तुम्हाला समस्या येणार नाही.

विविध बँका आपल्या ग्राहकांना त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी गृह कर्ज उपलब्ध करून देतात. यासाठी ग्राहकाचा सिबिल स्कोर चांगला असणे आवश्यक आहे. असे असले तरीही गृह कर्जाची प्रक्रिया करतेवेळी बँका काही नॉन रिफंडेबल चार्जेस आपल्याकडून घेतात. (Home Loan Charges) वेगवेगळ्या बँक गृह कर्ज देताना वेगवेगळे चार्जेस लावतात. त्यामुळे या अतिरिक्त शुल्काबाबत आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. आज आपण हीच माहिती जाणून घेणार आहोत. ज्यामुळे तुम्ही गृह कर्ज घेताना पूर्ण विचारानिशी कोणत्या बँकेतून कर्ज घ्यायचे हे ठरवू शकाल. चला तर जाणून घेऊया.

गृह कर्जासाठी प्रोसेसिंग फी (Home Loan Charges)

अनेक बँका आपल्या ग्राहकांना गृह कर्ज अगदी स्वस्त व्याजदरात देतात. मात्र यासोबत बँका प्रोसेसिंग फीसुद्धा घेतात. वेगवेगळ्या बँकेच्या वेगवेगळ्या प्रोसेसिंग फी असू शकतात. हे चार्जेस तुमच्या होम लोनच्या अर्जावर प्रक्रिया करण्यासाठी चार्ज केले जातात. या प्रोसेसिंग फीचा आणि तुम्हाला कर्ज मिळण्याचा काहीही संबंध नसतो. अर्थात प्रोसेसिंग फीही केवळ अर्जासाठी घेतली जाते. याचा तुम्हाला कर्ज मिळेल की नाही याच्यासोबत संबंध नसतो. त्यामुळे जर तुम्हाला कर्ज मान्य झाले नाही तर ही फी तुम्हाला परत मिळत नाही. अर्थात कर्ज मिळेल किंवा नाही मिळेल प्रोसेसिंग करायची असेल तर तुम्हाला ही फी भरणे बंधनकारक आहे.

(Home Loan Charges) त्यामुळे लक्षात घ्या, जर तुम्ही बँक किंवा वित्तीय संस्थेकडे गृह कर्जासाठी अर्ज दाखल केलात आणि त्यानंतर तुमचा विचार बदलला तर तुम्ही भरलेली प्रोसेसिंग फी वाया जाईल. म्हणूनच अर्ज करण्यापूर्वी तुम्ही याच बँकेतून किंवा संस्थेतून कर्ज घ्यायचे आहे याची खात्री करा आणि मग अर्ज दाखल करा.

प्रोसेसिंग फी माफ होऊ शकते का?

अनेकदा गृह कर्ज करताना ग्राहकाकडून प्रोसेसिंग फी मध्ये सूट मिळण्याबाबत प्रश्न विचारले जातात. जसं कि, प्रोसेसिंग फी मध्ये सूट मिळेल का? किंवा प्रोसेसिंग फी माफ केली जाऊ शकते का? (Home Loan Charges) यावर सांगायचे झाले तर, प्रोसेसिंग फी हि तुमच्या कर्जासाठी अर्ज करण्यासाठी आकारले जाणारे शुल्क आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत प्रोसेसिंग फी रिफंड होत नाही.

मात्र, काही बँका प्रोसेसिंग फीचा काहीसा भाग तुमच्या कर्जाच्या अर्जासोबत आणि उर्वरित रक्कम कर्ज मिळण्यापूर्वी भरण्याची परवानगी देतात. ही फी कर्जाच्या टक्केवारीनुसार निर्धारित केली जाते. काही प्रकरणांमध्ये बँके प्रोसेसिंग फी माफ करू शकते. यासाठी तुम्हाला बँकेकडे विनंती करावी लागेल. दरम्यान तुम्ही बँकेला तुमची बाजू सक्षमपणे पटवून देऊ शकलात तर इच्छेनुसार बँक तुम्हाला सवलत देऊ शकते. (Home Loan Charges)