Home Loan : घरासाठी कर्ज काढण्याचा विचार करताय? त्यापूर्वी ‘या’ गोष्टींची माहिती जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Home Loan : आपलं हक्काचं असं घर असावं असे कोणाला नाही वाटत? प्रत्येकाचीच तशी इच्छा असते. मात्र पैशाच्या अभावी अनेकजण इच्छा असूनही घर बांधू शकत नाहीत. तर काहीजण कर्ज काढून घर बांधतात. अनेक बँका पतसंस्था वेगवेगळ्या व्याजदरानुसार आणि अटीनुसार गृहकर्ज देत असतात. तुम्ही सुद्धा घर बांधण्यासाठी कर्ज काढण्याच्या तयारीत असाल तर त्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. जेणेकरून भविष्यात गृहकर्जाची परतफेड करताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये. चला आज आपण जाणून घेऊयात नेमक्या कोणत्या गोष्टी तुम्हाला जाणून घेतल्या पाहिजेत.

चांगली चौकशी करा –

गृहकर्ज (Home Loan) घेत असताना व्यवस्थित चौकशी करणं आवश्यक्य आहे. बाजारात सध्या अनेक बँक आणि NBFC तुम्हाला सर्वात स्वस्त देण्यास तयार असतात. त्यातील तुमच्यासाठी योग्य बँक कोणते हे पहा. बँकांच्या वेगवेगळ्या अटी आणि शर्ती असतात, या सर्व गोष्टीची व्यवस्थित माहिती घ्या. म्हणजे कर्ज परत करत असताना तुम्हाला बँकेशी संबंधित कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागणार नाही.

अंथरून पाहून पाय पसरा –

असं म्हणतात कि माणसाने नेहमी अंथरून पाहून पाय पसरायला हवे. त्यामुळे जितक्या कर्जाची तुम्ही परतफेड करू शकता तेवढच कर्ज बँकेकडून घ्या. उगीच भलीमोठी रक्कम कर्जाच्या रूपात घेऊ नका. कारण ते परतफेड करताना तुमच्या नाकीनऊ येईल. तुमच्या पगारानुसार आणि ऐपतीनुसार कर्ज घ्या. आणि हे कर्ज परत करत असताना तुमचा जो काही EMI म्हणजेच महिन्याचा हप्ता असेल तो पगाराच्या 50 टक्क्यांपेक्षा जास्त नसावा.

फ्लोटिंग आणि निश्चित व्याजदर- Home Loan

कोणतेही गृहकर्ज घ्यायचं म्हंटल तर बँका दोन प्रकारच्या व्याजदरांवर देतात. एक म्हणजे फ्लोटिंग आणि दुसरं म्हणजे स्थिर व्याजदर . यातील फ्लोटिंग व्याजदरामध्ये, गृहकर्जाचा व्याजदर आरबीआयने जाहीर केलेल्या रेपो दराच्या आधारे ठरवला जातो. म्हणजेच जर का रेपो रेट कमी झाला तर तुमचे गृहकर्ज कमी होते आणि रेपो रेट वाढला तर तुमच्या गृहकर्जावरील व्याजदरात सुद्धा त्यानुसार वाढ होऊ शकते. तर दुसरीकडे स्थिर व्याजदरामध्ये गृहकर्जाचे व्याज संपूर्ण मुदत कालावधीत आहे असंच राहते आणि त्यात कोणताही बदल झालेला दिसत नाही.

ओव्हरड्राफ्ट सुविधा –

आजकालच्या महागाईच्या काळात गृहकर्ज (Home Loan) नेहमी ओव्हरड्राफ्ट सुविधेसह घेतले पाहिजे. यामुळे तुम्हाला असा फायदा होतो कि जेव्हा कधी तुमच्या एकदम मोठी रक्कम येईल त्यावेळी तुम्ही ते सर्व पैसे बँकेत जमा करू शकता आणि यामुळे तुमचा महिन्याचा EMI सहज कमी होऊ शकतो. असं झाल्यास तुमचे गृहकर्ज निश्चित कालावधीच्या आधीही तुम्ही फेडू शकता.