हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Home Loan EMI) स्वतःच्या हक्काचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाची धडपडसुद्धा वेगळी असते. त्यात घरांच्या किंमती आभाळाला हात टेकून बसल्याने ही स्वप्नपूर्ती घाम फोडणारी ठरते. अशावेळी बँकेकडून मिळणारी गृहकर्ज सुविधा अत्यंत लाभदायी ठरते. त्यामुळे आजकाल घर घेताना प्रत्येकजण होम लोनचा पर्याय निवडतो. लोकांची गरज पाहता गेल्या काही काळात बँकांनी होम लोन मिळवण्याची प्रक्रिया सुलभ आणि सोपी करून दिली आहे.
त्यामुळे आजकाल होमलोन घेणाऱ्या लोकांची संख्या वाढली आहे. साधारणपणे होमलोनचा कालावधी हा १५ ते २० वर्षांचा असतो. काहीवेळा तो जास्तही असू शकतो. यामुळे प्रत्येक महिन्याला निश्चित रकमेचा हफ्ता भरणे बंधनकारक असते. ठरलेल्या कालावधीपर्यंत मासिक स्वरूपात ही रक्कम हफ्ता म्हणून कापली जाते. (Home Loan EMI) पण यामुळे अनेक लोकांचे आर्थिक नियोजन गडबडते. अनेकांना महिन्यातून जाणारा हफ्ता कालांतराने आर्थिक ताण वाटू लागतो. एखाद्या महिन्याला EMI भरणे कठीण झाल्यास लोनचे हप्ते थकण्याची शक्यता वाढते. परिणामी खाते डिफॉल्ट होऊ शकते. अशावेळी तुम्ही होमलोनच्या हप्त्याची रक्कम कमी करू शकता. आता ती कशी काय? हे जाऊन घेऊ.
‘या’ टिप्स वापरल्यास गृहकर्जाचा बोजा वाटणार नाही (Home Loan EMI)
- लोन ट्रान्सफर
गृहकर्जाचा बोजा कमी करण्यासाठी तुम्ही लोन ट्रान्सफर अर्थात लोन हस्तांतर सुविधेचा लाभ घेऊ शकता. यात तुमचे री- पेमेंट रेकॉर्ड उत्तम असायला हवे, हे लक्षात घ्या. यामुळे तुम्हाला शिल्लक गृहकर्जाची रक्कम दुसऱ्या बँकेत ट्रान्सफर करणे सोपे जाते. अशा पद्धतीने तुम्ही गृहकर्जाची रक्कम दुसऱ्या बँकेत ट्रान्सफर केल्याने तुम्हाला नव्या बँकेत कमी व्याजदराने कर्ज मिळू शकते. (Home Loan EMI) इतकेच नव्हे तर यामुळे आपोआप तुमच्या मासिक हप्त्याची रक्कम कमी होते आणि आर्थिक नियोजन करणे थोडे सोपे जाते.
- लोन प्री पेमेंट
गृहकर्जाच्या हफ्त्याबाबत तुम्ही सतर्क असणे गरजेचे आहे. अशावेळी तुम्ही होम लोन प्री पेमेंटच्या सुविधेचा वापर करून मध्यंतरीच्या कालावधीत तुमच्याकडे बऱ्यापैकी पैसा असेल तेव्हा लोन प्री पेमेंट करून मोकळे होऊ शकता. यामुळे कर्जाचे हप्ते कमी होण्यास मदत होते. शिवाय प्री पेमेंटमूळे कर्जाच्या मूळ रकमेतून प्री पेमेंट केलेली रक्कम कमी होते. परिणामी मासिक हप्ता कमी होतो.
- लोन रिस्ट्रक्चर
(Home Loan EMI) लोन रिस्ट्रक्चरच्या पर्यायाचा वापर करून तुम्ही कर्जाचा हप्ता वाढवून घेऊ शकता. यामुळे होमलोन लवकर संपण्यास मदत होते. मुख्य म्हणजे या पर्यायाचा वापर केल्याने व्याजदेखील कमी द्यावे लागते.
- EMI कमी करणे
प्रतिमहिना कर्जाचे हप्ते भरताना जर आर्थिक गणितं हलत असतील तर तुम्ही चालू हप्त्याची रक्कम कमी करून घ्या. लक्षात घ्या, यामुळे तुमच्या कर्जाचा कालावधी वाढेल आणि यामुळे अधिक व्याज द्यावे लागेल. पण, कर्जाच्या हप्त्याची रक्कम मात्र कमी होईल. (Home Loan EMI)