महागड्या Home Loan वरील व्याज दर अशाप्रकारे करा कमी, मिळेल दुहेरी फायदा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Home Loan : RBI कडून रेपो दरात वाढ केल्यामुळे बँकांकडून एफडी, बचत खात्यातील डिपॉझिट्स आणि कर्जावरील व्याजदरात वाढ केली जाते आहे. अशा परिस्थितीत, जर आपण एखाद्या बँकेकडून होमलोन घेतले असेल तर कदाचित त्यावर जास्त व्याज द्यावे लागेल. मात्र आज आपण एक मार्ग जाणून घेणार आहोत ज्याद्वारे आपण जास्त व्याजदर देण्यापासून वाचू शकाल.

4 Things to Consider Before You Apply For A Home Loan > Blog

जर आपल्या बँकेने कर्जावरील (Home Loan) व्याजदर वाढवले ​​असतील आणि तर आता आपले कर्ज सहजपणे दुसऱ्या बँकेमध्ये ट्रान्सफर करता येईल. मात्र, असे करत असताना काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. चला तर मग आपले कर्ज दुसऱ्या बँकेत ट्रान्सफर करण्याचे फायदे आणि ते करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात ते जाणून घेउयात…

लोन ट्रान्सफरसाठी अशा प्रकारे करा बँकेची निवड

आपले कर्ज दुसऱ्या बँकेत ट्रान्सफर करण्याआधी Home Loan देणाऱ्या सर्व बँकांच्या व्याजदरांची तुलना करा. यानंतर आपल्याला सोयीस्कर ठरेल अशा बँकेची निवड करा. यानंतर, आपण ज्या बँकेतून कर्ज घेतले आहे त्या बँकेच्या शाखेशी संपर्क साधून बँकेला कर्ज ट्रान्सफर करण्याविषयी सांगा.

StanChart launches interest only home loan facility

लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी

आपले कर्ज ट्रान्सफर करण्यासाठी, ज्या बँकेतून कर्ज घेतले आहे त्या बँकेत फोरक्लोजरसाठी अर्ज करावा लागेल. इथून आपल्या अकाउंटचे स्टेटमेंट आणि मालमत्तेची कागदपत्रे ज्या बँकेत कर्ज ट्रान्सफर (Home Loan) करत आहात तिथे सबमिट करावी लागेल. याशिवाय जुन्या बँकेतून एनओसी घेऊन ती नवीन बँकेत जमा करावी लागेल. या संपूर्ण प्रक्रियेसाठी बँकेकडून एक टक्के प्रक्रिया शुल्क आकारले जाऊ शकेल.

How to choose a suitable home loan provider | Mint

लोन ट्रान्सफर करण्याचे फायदे

आपले कर्ज (Home Loan) कमी व्याजदरासहीत दुसऱ्या बँकेत ट्रान्सफर केल्याने कर्जाचा EMI आधीपेक्षा कमी होईल. याद्वारे दरमहा पैशांची बचत होईल. जर आपल्या कर्जाची रक्कम जास्त असेल तर साहजिकच आपली बचत देखील जास्त होईल. ही रक्कम म्युच्युअल फंडासारख्या कोणत्याही योजनेत गुंतवून चांगला रिटर्न मिळवता येऊ शकेल. यामुळे एकीकडे व्याजाचे पैसे वाचतील आणि दुसरीकडे गुंतवणुकीवर रिटर्न देखील मिळेल.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.bankbazaar.com/home-loan-balance-transfer.html

हे पण वाचा :
MS Dhoni दिसणार चक्क पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत, सोशल मीडियावर फोटोने घातला धुमाकूळ
IDFC First Bank ने ग्राहकांना दिला धक्का, आता क्रेडिट कार्डने भाडे भरण्यासाठी द्यावे लागणार अतिरिक्त शुल्क
Multibagger Stock : अवघ्या 2 वर्षात या शेअर्सने गुंतवणूकदारांना मिळवून दिले लाखो रुपये
‘या’ ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्मवर Vivo T1 साठी दिला जातोय जबरदस्त डिस्काउंट, जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
आता WhatsApp वर मिळवा LIC पॉलिसीशी संबंधित प्रत्येक माहिती, घरबसल्या उपलब्ध होणार ‘या’ सेवा