Home loan Low Interest | Home Loan काढायचे आहे? भारतातील या लहान बँका देतायेत सर्वात कमी व्याजदर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| या महिन्यात नुकतेच नवीन आर्थिक वर्ष झालेले आहे. या आर्थिक वर्षात अनेक व्यवहारांमध्ये बदल केलेले आहेत. परंतु भारतीय रिझर्व बँकेने व्याजदरांमध्ये कोणताही बदल केलेला नाहीये. तब्बल 7 व्या वेळा आरबीआयने दरामध्ये कोणताही बदल केलेला नाही. तो सध्याच्या स्तरावर कायम ठेवलेला आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळालेला आहे. तुम्ही जर आता कमी व्याजदरमध्ये होम लोन (Home loan Low Interest) घ्यायचा विचार करत असाल, तर आज आम्ही तुम्हाला अशा काही सरकारी आणि प्रायव्हेट बँकांबद्दल माहिती सांगणार आहोत, जिथे तुम्हाला अगदी कमी व्याजदरात होमलोन मिळते.

माध्यमातील वृत्तानुसार देशात एकूण 15 अशा बँका आहेत. ज्या तुम्हाला 20 वर्षाच्या कालावधीसाठी 75 लाख रुपये होम लोन देतात. या होम लोनवर 9.4% पेक्षा कमी व्याजदर तुम्हाला देतात. त्यामुळे तुमचा चांगला फायदा होतो. त्याचप्रमाणे इतरही काही बँक आहेत. ज्या कमी व्याज दराने (Home loan Low Interest) कर्ज देतात. यामध्ये बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक, इंडियन बँक, बँक ऑफ इंडिया, इंडसइंड बँक आणि आयडीबीआय बँक यांचा समावेश होतो या बँका तुम्हाला होमलोनवर 8.4 टक्केपासून व्याजदर देतात.

त्याचप्रमाणे आपण कॅनरा बँक आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्या होम लोनच्या (Home loan Low Interest) प्रक्रियेबद्दल जाणून घेतले, तर या बँका त्यांच्या ग्राहकांना 8.5% पासून होमलोनवर व्याज देतात. अशावेळी 20 वर्षाच्या कालावधीसाठी 75 लाख रुपयांच्या होम लोन घेतले तर या साठी तुम्हाला ईएमआय 64 हजार 650 रुपये एवढा असेल.

यासोबतच आपण भारतातील आणखी काही लोकप्रिय बँकांमधील होम लोनचा व्याजदर जाणून घेणार आहोत. यामध्ये कोटक महिंद्रा बँक ही देखील एक भारतातील उत्कृष्ट आणि नावाजलेली बँक आहे. ही बँक त्यांच्या ग्राहकांना होम लोनवर 8.7 टक्के दराने व्याज देते. आयसीआयसीआय बँक ही खूप प्रसिद्ध बँक आहे. या बँकेची आणि ग्राहक जोडलेले आहेत. या बँकेच्या ग्राहकांना अनेक सुविधा देखील असतात. ही बँक त्यांच्या ग्राहकांना होम लोनसाठी 9 टक्क्यांनी व्याजदर देते.

भारतीय स्टेट बँक हे आपल्या देशातील सर्वात मोठी सरकारी बँक आहे. ही बँक त्यांच्या ग्राहकांना होम लोनवर 9.15 टक्के दराने व्याजदर देते. त्याचप्रमाणे प्रायव्हेट सेक्टरमधील सगळ्यात मोठी बँक एचडीएफसी बँक ही त्यांच्या ग्राहकांना होम लोनवर 9.4% पासून व्याजदर देत असते. या भारतातील अशा काही बँका आहेत ज्या बँकांमध्ये तुम्ही अगदी कमी दरामध्ये होम लोन घेऊ शकता.