Home Loan : घर घेणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. प्रत्येकजण स्वत:साठी स्वप्नातील घर घेण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे काळजीपूर्वक विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. गृहकर्जाच्या मदतीने घर खरेदी करण्यापूर्वी दोनदा विचार करावा लागतो. बँका आणि वित्तीय संस्था सहज गृहकर्ज देत आहेत. डिजिटल युगात ही प्रक्रिया घरबसल्या पूर्ण होत आहे. जर तुम्ही गृहकर्जाच्या मदतीने पहिल्यांदा घर खरेदी करत असाल तर तुम्हाला फायनान्स कंपनीकडून अनेक प्रकारच्या सुविधा मिळतात. चला आजच्या लेखात जाणून घेऊया गृह (Home Loan) कर्जाबाबतच्या महत्वाच्या बाबी…
कर्ज घेण्यापूर्वी तुमची आर्थिक स्थिती तपासा
गृह कर्ज घेण्यापूर्वी तुमच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेणं महत्त्वाचे आहे. कारण गृह कर्जाच्या नियमानुसार तुम्हाला अधिक काही डाऊन पेमेंट भरावे लागते हे मालमत्तेच्या एकूण किमतीच्या दहा टक्के ते 25 टक्के असू शकते. त्यामुळे गृह कर्ज (Home Loan) घेतल्यानंतर तुम्हाला मासिक हप्ता सुरू होतो जो दीर्घकाळ चालू राहणार असतो. त्यामुळे आधी तुमची आर्थिक परिस्थिती कशी आहे हे तपासा आणि त्यानंतरच कर्ज घेण्याचं धाडस करा.
कर्जाची रक्कम ठरवा (Home Loan)
कर्ज घेत असताना एक साधा नियम लक्षात ठेवा. तुमचा ईएमआय पगाराच्या 40% पेक्षा जास्त नसावा. त्यामुळे कर्ज घेण्यापूर्वी तुमच्या सर्व गरजा पूर्ण होत आहेत का? तुम्ही सहजरीत्या गृह कर्जाचा हप्ता (Home Loan) भरू शकता का? हे मात्र नक्की तपासून पहा.
बँकांच्या कर्जाची वैशिष्ट्य तपासा
गृह कर्ज घेत असताना वेगवेगळ्या बँकांचे व्याजदर, कर्जाची रक्कम, एलटीव्ही प्रमाण, कर्जाचा कालावधी (Home Loan) आणि प्रक्रिया शुल्क यामध्ये फरक आहे अशा परिस्थितीत गृह कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी बँकांच्या कर्जाच्या वैशिष्ट्यांची तुलना करा आणि नंतरच कर्जासाठी अर्ज करा. शिवाय कर्जासाठी अर्ज करत असताना तुमचा क्रेडिट स्कोर चांगला आहे का नाही हे तपासा. शक्यतो क्रेडिट स्कोर चांगला असावा ज्यामुळे तुमची विश्वासार्हता वाढते आणि कर्ज मंजूर होण्यास लवकर मार्ग मोकळा होतो.
डाऊन पेमेंट जास्त करा (Home Loan)
जर तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल तर गृह कर्जासाठी डाऊन पेमेंट भरताना जास्त रक्कम भरा. पण डाऊन पेमेंट (Home Loan) जास्त करण्यासाठी तुमचा आपत्कालीन निधी वापरू नका.
आपत्कालीन निधी शिल्लक ठेवा (Home Loan)
अनेकदा गृह कर्ज घेतल्यानंतर आपल्याकडं आपत्कालीन निधी म्हणजे इमर्जन्सी साठी (Home Loan) वापरायचे पैसे हे शिल्लक राहिलेले नसतात. गृह कर्ज घेतल्यानंतर असं होता कामा नये. तुमच्याकडे इमर्जन्सी फंड नेहमी आवश्यक ठेवा हा फंड तुमच्या सहा महिन्यांच्या ईएमआय हप्ता इतका असावा. बऱ्याच वेळा नोकरी गमावल्यानंतर किंवा इतर कोणत्याही परिस्थितीमुळे ई एम आय भरणं अशक्य होतं त्यामुळे तुम्हाला दंड आकारला जाऊ शकतो आणि तुमचा क्रेडिट स्कोर देखील खराब होऊ शकतो अशा परिस्थितीत तुमचा आपत्कालीन निधी हा उपयुक्त ठरतो.