Home Loan | होमलोन फेडल्यानंतर लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी; अन्यथा होईल मोठे नुकसान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Home Loan |आपले एक स्वतःचे हक्काचे घर असावे हे प्रत्येकाचे स्वप्न असते, परंतू सध्या जर आपण पाहिले तर जमिनींचे आणि फ्लॅटचे दर एवढे वाढलेले आहे की, प्रत्येकाला हे स्वप्न आता पूर्ण करायला जमत होत नाही. परंतु आजकाल बँका देखील आपले हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत करत आहे. बँकांच्या माध्यमातून आपल्याला सहजपणे होम लोनचा पर्याय मिळतो. आणि त्यातून अनेकजण होमलोन घेऊन घर घेतात. परंतु कर्ज घेतले तरी, आपल्याला वेळेत त्याची परतफेड करावी लागते.

होमलोन (Home Loan) हे खूप जास्त रकमेचे असते. आपण जेव्हा हे होम लोन संपूर्ण फेडतो. त्यावेळी आपल्याला एक मोठ्या कर्जातून सुटका झाल्याची भावना येते. परंतु तुम्ही तुमच्या लोन जरी पूर्ण फेडले असेल, तरी काही गोष्टींची काळजी घेणे खूप गरजेचे असते. तुम्ही बँकेकडून तुमची काही महत्त्वाचे कागदपत्र परत मागायला पाहिजे. कारण जेव्हा बँक आपल्याला होम लोन देते. तेव्हा आपल्याकडून काही कागदपत्रे घेते आणि काही गोष्टी लिहून देखील घेत असते. परंतु आपण हे लोन (Home Loan) फेडल्यानंतर बँकेकडून ही कागदपत्र परत मागत नाहीत. आता अशी कोणती काम कागदपत्र आहे? जी आपण लोन संपल्यानंतर बँकेकडून घेणे गरजेचे आहे. हे आपण जाणून घेऊया.

बँकेला दिलेले पोस्ट डेटेड चेक | Home Loan

आपण बँकेकडून जेव्हा कर्ज घेतो, तेव्हा बँक आपल्याला काही चेक देते. एखाद्या वेळेस जर आपला कर्जाचा हप्ता चुकला, तर बँकेचे वापर करून त्याचे पैसे वसूल करत असते. हा चेक देण्यामागे उद्देश हाच असतो की जर तुम्ही बँकेचे लोन पूर्णपणे फेडले नाही, तर ही बँक तुमच्याकडून चेक मागून घेत असते. जेव्हा आपण आपले कर्ज पूर्णपणे फेडतो. तेव्हा बँकेकडून हेच एक मागून घेणे गरजेचे असते.

नो ड्युज सर्टिफिकेट मागणे

जेव्हा तुम्ही बँकेकडून घेतलेले कर्ज पूर्णपणे वेळेत फेडता. तेव्हा बँकेकडून तुम्ही सदर लोनची थकबाकी नाही. याचे प्रमाणपत्र घेणे खूप गरजेचे असते. जर तुम्ही हे प्रमाणपत्र घेतले नाही, तर तुम्हाला पुढच्या वेळेस अडचणी येऊ शकता. म्हणजेच कर्जाची परतफेड केल्यानंतर तुमच्याकडे बँकेचा एकही रुपया थकबाकी नाही, असा त्याचा अर्थ होतो.

कर्ज परतफेडचे प्रमाणपत्र

जेव्हा तुम्ही कर्जाची परतफेड करता. तेव्हा बँकेच्या माध्यमातून तुमचे कर्ज फेडीचे सर्व स्टेटमेंट मागून घेणे गरजेचे असते. त्यात तुमच्या पहिल्या पेमेंटपासून शेवटच्या पेमेंटपर्यंत सविस्तर माहिती दिलेली असते.

क्रेडिट रिपोर्ट अपडेट | Home Loan

जेव्हा तुम्ही होम लोन फेडता, त्यावेळी अनेक वेळा बँक ही कर्ज बंद झाल्याची माहिती देऊन क्रेडिट कंपनीला पुरवत नाही. यावेळी त्याचा नकारात्मक परिणाम तुमच्या क्रेडिट स्कोरवर होऊ शकतो. त्यामुळे बँकेचे लोन पूर्ण फेटल्यावर क्रेडिट रिपोर्ट अपडेट करून घेणे खूप गरजेचे आहे.