होम लोन, कार लोन स्वस्त; EMI अजून कमी होणार

loan (1)
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । RBI ने गेल्या काही दिवसांपूर्वी एक मोठी घोषणा केली होती. त्यांनी रेपो दरात 0.25 टक्क्यांची कपात केली असून, तो आता 6% वर आणला आहे . सलग दुसऱ्यांदा रेपो दरात कपात करत व्याजदरात आणखी घट केली आहे. फेब्रुवारीनंतर एप्रिलमध्येही RBI ने रेपो दर 6.50% वरून 6.00% पर्यंत कमी केला आहे. या निर्णयामुळे होम लोन, कार लोन आणि पर्सनल लोन स्वस्त होण्याची शक्यता आहे. तसेच येत्या काळात EMI मध्ये अजून घट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे सर्वसामान्याना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच यामध्ये अजून घट होऊ शकते असे एचएसबीसी ग्लोबल रिसर्चने आपल्या अहवालात सांगितले आहे.

व्याजदरात कमी होणार –

एचएसबीसी ग्लोबल रिसर्चने आपल्या अहवालात अंदाज वर्तवला आहे की RBI जून आणि ऑगस्टमध्ये होणाऱ्या धोरणात्मक बैठकींमध्ये व्याजदरात आणखी 25-25 बेसिस पॉइंट्सनी घट करू शकते. त्यामुळे आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये रेपो दर 5.50 टक्क्यांपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे.

महागाईमध्ये घसरण –

या अहवालानुसार अन्नधान्याच्या किमती सलग तिसऱ्या महिन्यात घसरल्या आहेत. भाज्या, डाळी, अंडी आणि मांसाच्या किमतीत घट झाल्यामुळे मार्चच्या तुलनेत एप्रिलमध्ये 0.7 टक्के महागाईत घसरण झाली आहे. विशेषतः कांदा अन टोमॅटोच्या किमती घसरल्यामुळे एप्रिलच्या पहिल्या दहा दिवसांत भाज्यांच्या दरात 0 ते 5 टक्क्यांची घट नोंदवण्यात आली आहे.

आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये महागाई –

एचएसबीसीने अंदाज वर्तवला आहे की आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये महागाई सरासरी 3.7 टक्क्यांच्या आसपास राहील, जी RBI च्या 4 टक्क्यांच्या लक्ष्यापेक्षा कमी आहे. एप्रिलपासून बाजारात नवीन गहू पिकाचे आगमन आणि भारत मौसम विभागाचा ‘सामान्य’ मान्सूनचा अंदाज यामुळे महागाई आणखी नियंत्रणात राहण्याची शक्यता आहे. तसेच रुपयाची अलीकडील मजबूती, चीनमधून आयात होणाऱ्या वस्तूंच्या दरातील घट, आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमती कमी होणे आणि देशांतर्गत मागणीतील मर्यादा यामुळेही महागाई दर स्थिर राहण्यास मदत होईल, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.