केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर

0
37
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे प्रतिनिधी । केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आज लोहगाव विमानतळावर आगमन झाले. वायुसेनेच्या विशेष विमानाने शहा आज पुण्यात पोहचले. देशातील पोलीस महासंचालक यांच्या राष्ट्रीय पातळीवरील परिषद पुणे येथे होणार आहे. या परिषदेला देशाचे गृहमंत्री यानात्याने शहा हजेरी लावणार आहेत.

यावेळी लोहागाव विमातनळावर शिष्टाचारचा भाग म्हणून शहा यांच्या स्वागतासाठी राज्याचे पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी हजर होते. एअर कमोडोर राहूल भसीन, गुप्त वार्ता विभागाचे संचालक अरविंद कुमार, पोलीस महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल, पोलीस आयुक्त डॉ के. व्यंकटेशम, उपजिल्हाधिकारी(राजशिष्टाचार) अमृत नाटेकर तसेच योगेश गोगावले, जयंत येरवडेकर यांनी लोहगाव विमानतळावर शहा यांचे स्वागत केलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here