Home Remedies For Dehydration | डिहायड्रेशनपासून वाचण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय, पाण्याची पातळी राहील नियंत्रणात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Home Remedies For Dehydration | एप्रिल महिना सुरू झालेला आहे. उन्हाची झळ देखील मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीराची काळजी घेणे खूप गरजेचे असते. कारण या दिवसात आपल्याला शरीरातील उष्णता वाढते. आणि त्या उष्णतेचा आपल्याला त्रास होतो. अनेकवेळा लोकांना डिहायड्रेशनचा त्रास देखील होतो. डीहायड्रेशन (Home Remedies For Dehydration) म्हणजे आपल्या शरीरातील पाण्याची पातळी अगदी कमी होते. त्यामुळे आपल्याला अनेक आजार होतात. म्हणूनच या समस्यांपासून दूर राहण्यासाठी आपल्याला उन्हाळ्यामध्ये भरपूर पाणी पिणे, त्याचप्रमाणे आपले शरीर हायड्रेट ठेवणे खूप गरजेचे असते.

आपल्या शरीराचे जवळपास 50 टक्के पाणी आहे. ज्यावेळी उन्हाळ्यात आपल्याला घाम येतो किंवा लघवीद्वारे आपल्या शरीरातील पाणी हे जास्तीत जास्त शरीरा बाहेर सोडले जाते. त्यामुळे आपल्या शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. म्हणूनच आपल्याला अशक्तपणा, चक्कर येणे, थकवा यांसारख्या समस्या निर्माण होतात. या सगळ्या समस्या डिहायड्रेशनमुळे होतात. त्यामुळे आपल्या शरीरातील पाण्याची पातळी नियंत्रित ठेवणे खूप गरजेचे आहे. तर आज आपण डिहायड्रेशनची समस्या दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय पाहणार आहोत.

नारळाचे पाणी प्या | Home Remedies For Dehydration

नारळाच्या पाण्याला अमृत म्हंटले जाते. अगदी आजारी व्यक्तीला देखील नारळाचे पाणी दिले जाते. नारळाच्या पाण्याने आपल्या संपूर्ण शरीर हाइट्रेट राहते. यामध्ये मुबलक प्रमाणात जीवनसत्वे आणि खनिजे असतात. नारळातील पाण्यामध्ये सोडियम आणि पोटॅशियम असते. त्यामुळे डीहायड्रेशनची समस्या दूर होते.

ताक पिणे

उन्हाळ्यामध्ये ताक मोठ्या प्रमाणात पिले जाते. ताक प्यायल्याने हायड्रेशनची समस्या कमी होते. ताकामध्ये नैसर्गिक प्रोबायोटिक असते. त्याचप्रमाणे पोटॅशियम आणि मॅग्नेशियम यांसारखे घटक देखील असतात. यामुळे आपल्या शरीरात ऊर्जा टिकून राहते आणि आपल्या शरीरातील पाण्याची कमतरता देखील दूर होते. तुम्ही उन्हाळ्याच्या दिवसात दिवसातून दोन ते तीन वेळा देखील ताक पिऊ शकता.

लिंबू पाणी प्या

उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. ती टिकून ठेवण्यासाठी लिंबू पाणी खूप उपयुक्त आहे. लिंबू पाणी प्यायल्यावर आपल्या शरीराला ऊर्जा देखील मिळते आणि आपल्याला फ्रेश वाटते. त्याचप्रमाणे शरीर पूर्णवेळ हायड्रेट राहते. यासाठी तुम्ही लिंबाचा रस पुदिन्याचा रस, काळे मीठ, मध या सगळ्याचे मिश्रण एकत्र करून दिवसातून दोन ते तीन वेळा पिऊ शकता. कारण लिंबामध्ये पोटॅशियम, सोडियम आणि मॅग्नेशियमसारखे घटक असतात त्यामुळे तुमचे शरीर हायड्रेट राहते.