झाडांना कीटक आणि रोगांपासून वाचविण्यासाठी घरच्या घरी बनवा कीटकनाशके 

0
164
Natural Pesticide
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या काळात कोणतीच गोष्ट शुद्ध राहिलेली नाही. शेतीत आणि झाडांना वापरण्यात येणारी कीटकनाशके देखील रासायनिक असतात त्यामुळे त्यांचा झाडांवर परिणाम होण्याची शक्यता असते. काही काळाने अशा कीटकनाशकांमुळे झाडांसोबत बऱ्याचदा जमीनही खराब होते. म्हणूनच हल्ली सेंद्रिय, नैसर्गिक कीटकनाशकांचा वापर करण्यास सांगितले जाते. आपण घरच्या घरी देखील काही नैसर्गिक कीटकनाशके वापरू शकतो. आपण आज अशाच काही कीटकनाशकांची माहिती घेऊया. ही कीटकनाशके आपण घरबसल्या तयार करू शकतो. ज्यामुळे आपल्या झाडांना आपण नैसर्गिक जीव प्रदान करू शकतो.

लसूण आणि काळी मिरी (Garlic and Hot Pepper) लसूण आणि काळी मिरी यांचा स्प्रे झाडांवरून एफिड्स नष्ट करण्यास मदत करतो म्हणून याला अत्यंत प्रभावी मानले जाते. म्हणूनच दर दुसऱ्या दिवशी झाडांवर याची फवारणी केली जाते. हे मिश्रण तयार करण्यासाठी ५-६ काळी मिरी आणि २-३ लसूण पाकळ्या घेऊन बारीक करून घ्यायच्या आणि स्प्रे बाटलीत शुद्ध पाण्यासोबत हे वाटण मिश्रित करायचे आणि झाडांवर स्प्रे करायचे. निलगिरी तेल (Nilgiri Oil)मधमाशा, माशा यांच्यासाठी हे एक अद्भुत नैसर्गिक कीटकनाशक आहे. झाडांना मधमाशा, माशा यांच्यापासून वाचविण्यासाठी हे उपयुक्त आहे. ५०० मिलिलिटर पाण्यात एक चमचा निलगिरी तेल घालून हे मिश्रण करतात. हे मिश्रण स्प्रे बाटलीत घालून स्प्रे बाटलीत तेल आणि पाणी मिसळून हलवितात आणि दर १०-१४ दिवसांनी झाडांवर स्प्रे करतात.

कडुलिंब तेल (Neem Oil)कडुलिंबाचे तेल हे पूर्णतः नैसर्गिक आणि जैविक आहे. अनेक वर्षांपासून कडुलिंब हा कवकनाशक, कीटकनाशक म्हणून घरातील झाडांवर येणाऱ्या कीटकांना नियंत्रित करण्यासाठी आणि मारण्यासाठी अत्यंत प्रभावी म्हणून वापरले जाते. अनेक वर्षांपासून भारतात याचा वापर होतो आहे. १ लीटर पाण्यात एक चमचा कडुलिंब तेल मिसळून हे मिश्रण तयार केले जाते. दर १५ दिवसांनी आपण झाडांवर हे मिश्रम फवारू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here