Home Remedies For SKin Tone | पुरुष असो किंवा स्त्रिया असो प्रत्येकजण आपल्या चेहऱ्याची खूप काळजी घेत असतात. आपला चेहरा उठून दिसेल, त्याचप्रमाणे चमकदार दिसेल याची सगळेजण काळजी घेत असतात. कारण आपला चेहरा ही आपली ओळख असते. परंतु सूर्यप्रकाश, प्रदूषण यांसारख्या कारणांमुळे आपल्या त्वचेबाबत अनेक समस्या उद्भवतात. आपल्या त्वचेचा रंग (Home Remedies For SKin Tone) बदलतो म्हणजेच आपले कपाळ तसेच ओठांच्या बाजूची त्वचा ही सावळी पडते. तर इतर ठिकाणी त्वचेचा रंग नीट असतो.
परंतु जर तुमचा चेहरा मधेच गोरा आणि सावळा असेल तर तो खूप विचित्र दिसतो. जर तुम्हाला देखील अशाच समस्येचा त्रास होत असेल. तर तुम्ही काही नैसर्गिक गोष्टींचा अवलंब करून तुमच्या त्वचेचा टोन एकसारखा करू शकता. त्याचप्रमाणे तुमच्या चेहऱ्यावर काही भागातली त्वचा कोरडी असते, तर काही भागात तेलकट असते. त्यामुळे देखील तुमच्या चेहऱ्याचा टोन बदलतो. आता आपण हा चेहऱ्याचा टोन एकसारखा करण्यासाठी काय करावे लागेल हे पाहणार आहोत.
हळदीचा फेस पॅक
हळदी हे एक अँटिऑक्सिडंट आहे. त्याचप्रमाणे तुमच्या चेहऱ्याचा रंग सुधारण्यासाठी देखील हळदीचा खूप चांगला उपयोग होतो. त्याचप्रमाणे इतर अनेक समस्यांपासून देखील हळदीपासून आपल्याला फायदा होतो. तुम्ही त्वचेचा टोन सुधारण्यासाठी अर्धा चमचा दुधात एक चमचा हळद मिसळून पेस्ट बनवा. आणि चेहऱ्याला लावा हळूहळू तुम्हाला तुमच्या चेहऱ्याच्या रंगात बदल झालेला दिसेल.
कडुलिंब आणि मुलतानी माती | Home Remedies For SKin Tone
मुलतानी माती तुमची त्वचा मऊ करण्यासाठी त्याचप्रमाणे चेहऱ्याचा रंग उजळण्यासाठी काम करते. त्याचप्रमाणे कडुनिंब ही एक औषधी गुणधर्म असलेली वनस्पती आहे. तुमच्या चेहऱ्यावर आलेले पिंपल्स, डागधब्बे दूर करण्यासाठी कडुलिंब चांगले काम करते. त्यामुळे अर्धा चमचा कडुलिंबाची पावडर आणि तेवढीच तुळस पावडर आणि एक चमचा मुलतानी माती घेऊन त्यात गुलाब पाणी घालून हा फेसपॅक बनवा. दहा ते पंधरा मिनिटे हा तुमच्या चेहऱ्यावर लावा आणि नंतर साध्या पाण्याने धुऊन टाका.
त्याचप्रमाणे तुम्ही ॲपल साइडर विनेगर संध्याकाळी तुमच्या त्वचेला लावू शकता. हे देखील तुमच्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. यासाठी तुम्ही एक चमचा व्हिनेगर आणि एक चमचा कांद्याचा रस करून पंधरा मिनिटे चेहऱ्याला लावा. नंतर साध्या पाण्याने चेहरा धुऊन झोपा. त्यानंतर काही दिवसातच हळूहळू तुमच्या चेहऱ्यावर चांगला परिणाम दिसावा लागेल.
तुमच्या त्वचेचा टोन जर तुम्हाला एक सारखा पाहिजे असेल तर तुम्ही स्वतःहून देखील काही काळजी घेणे गरजेचे आहे. जसे की तुम्ही घराच्या बाहेर पडताना सनस्क्रीन लावणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे बाहेर जाताना तोंड बांधणे खूप गरजेचे आहे. तसेच तुम्ही उन्हाळ्याच्या दिवसात भरपूर पाणी प्यायल्याने देखील तुमच्या त्वचेला त्याचा फायदा होतो.